मुंबई, 20 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर आणि अली अब्बास जफर (ali abbas zafar) दिग्दर्शित वेब सीरीज ‘तांडव’ला (Web Series Tandav) देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून हिंदू देवी-देवतांचां अपमान केल्याचा आणि जातीय भावना भडकवल्याचा आरोप वेब सीरीज निर्मात्यांवर आहे. त्यामुळे ही वेब सीरिज बॅन (Ban on Tandav) करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. हा वाढता विरोध लक्षात घेवून या वेब सीरिजमधील वादग्रस्त सीन्स काढून टाकण्यात आले आहेत. असं असलं तरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, कारण उत्तरप्रदेश पोलिसांचं एक पथक त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबईला दाखल झालं आहे. तांडव निर्मात्यांची चौकशी केली जाईल या प्रकरणात लखनऊच्या हजरतगंज येथील चार पोलीस अधिकाऱ्यांचं पथक मुंबईला दाखल झालं आहे. हे पथक दिग्दर्शक अली अब्बास जफर, Amazon Prime Video च्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशु किशन मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांची चौकशी करणार आहेत. या सर्वांना या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलं आहे. यांच्यावर ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, त्यावरून त्यांच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हे पोलीस पथक बुधवारीच सर्व आरोपींची चौकशी करून जाब नोंदवून घेणार आहे. त्यामुळे तांडव वेब सीरीज मधील वादग्रस्त सीन्स हटवल्यानंतरही त्यांच्या अटकेची टांगती तलवार आहे.
— ali abbas zafar (@aliabbaszafar) January 19, 2021
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी मागितली माफी दिग्दर्शक अली अब्बास जफरने काल एक ट्वीट करून माफी मागितली आहे. त्यावेळी त्यांनी तांडवमधील आक्षेपार्ह सीन बदलणार असल्याचंही म्हटलं होती. तसेच तांडवच्या टीमकडून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असंही या पोस्टमध्ये म्हटलं होतं. पण कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो. तसेच आवश्यक ते बदल करण्याचा निर्णयही घेतल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

)







