• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कोर्टाने इशारा देताच पंगा गर्ल सुनावणीला हजर; जावेद अख्तर मानहानी प्रकरणी अडचणीत वाढ

कोर्टाने इशारा देताच पंगा गर्ल सुनावणीला हजर; जावेद अख्तर मानहानी प्रकरणी अडचणीत वाढ

File Photo

File Photo

पुढील सुनावणीस हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा अंधेरी कोर्टाकडून काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आज म्हणजेच सोमवारी कंगना राणौत (Kangana Ranaut) न्यायालयात हजर राहिली आहे.

  • Share this:
मुंबई, 20 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar Defamation Case) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतविरोधात (Kangana ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता. या घटल्याची सुनावणी सुरू असताना कंगना अनेकदा सुनावणीसाठी गैरहजर राहिली होती. पण पुढील सुनावणीस हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा कोर्टाकडून काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आज म्हणजेच सोमवारी कंगना राणौत न्यायालयात हजर राहिली आहे. कंगना रणौत आज अंधेरी कोर्टात हजर झाली होती. सुनावणी दरम्यान कंगनाच्या वकिलाचं म्हणणं होतं की, कंगना रणौतला अंधेरी न्यायालयावर विश्वास नाही. त्यामुळे संबंधित मानहानी प्रकरण अन्य कोर्टाकडे वर्ग करण्यासाठी अपील करण्यात आल्याचंही कंगनाच्या वकिलाकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. हेही वाचा-राज कुंद्रा 119 पोर्न फिल्म 8.84 कोटींना विकण्याच्या होते तयारीत; बिझनेस प्लॅन दुसरीकडे कंगना राणौतने जावेद अख्तर यांच्याविरोधात कलम 384 अंतर्गत खंडणीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कंगानाने जावेद अख्तर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 383, 384, 387, 503, 505 R/w44 आणि 33  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला... खरंतर, गेल्या सुनावणीत कंगना रणौक कोर्टात हजर राहिली नव्हती. त्यावेळी कंगना आजारी असल्याचं वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर कोर्टाने कंगनाच्या प्रकृतीबाबत दखल घेत, मानहानी प्रकरणात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूट दिली होती. तसेच न्यायालयाने असंही म्हटलं होतं की, 'कंगना पुढील सुनावणीसाठी हजर राहिली नाही तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला जाऊ शकते.' त्यामुळे कंगना आज अंधेरी कोर्टात सुनावणीसाठी हजर राहिली होती.
Published by:News18 Desk
First published: