• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) कार्यालयं, मालमत्ता आणि निवासस्थान यांचं सर्वेक्षण केल्यानंतर आता सोनू सूदने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याला त्याची बाजू सांगण्याची गरज नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीयाचा पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं म्हणत, त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या फाउंडेशमधील प्रत्येक रुपया अनमोल जीवन वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. अनेक प्रसंगी मी ब्रँड्सनाही धर्मादाय संस्थांना देण्याचं आवाहन केलं आहे. भारतातील लोकांच्या सेवेसाठी मी स्वतःचं हृदय आणि संपूर्ण शक्ती काम करत आहे. गेले काही दिवस मी व्यस्त होतो, परंतु आता पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी परत आलो असल्याचं त्याने म्हटलं आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई (Mumbai) स्थित घरावर आयकर विभागाची टीम दाखल झाली होती. आयकर विभागाच्या टीमने सोनूच्या घराचा सर्वे केला. आयटी विभाग मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या 6 भागांमध्ये एक सर्वेक्षण अभियान सुरू केलं होतं. त्यानंतर आता सोनू सूदने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  सोनू सूदच्या मुंबईतील घरी आयकर विभागाची टीम; सहा ठिकाणी केली पाहणी

  शनिवारी Central Board of Direct Taxes विभागाकडून 20 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप केला आहे. कोरोनादरम्यान सोनू सूदने गरजूंना मोठी मदत केली आहे. माध्यमांसह सर्वसामान्यांनी सोनूच्या कामाचं मोठं कौतुक केलं आहे. कोरोना महासाथीदरम्यान घरी परतणाऱ्या मजुरांना सोनूने वाहनांची व्यवस्था करून दिली, तर अनेकांना आर्थिक साहाय्य केलं.
  Published by:Karishma
  First published: