मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

एकेकाळी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले जेष्ठ अभिनेता जयराम कुलकर्णी याचं आज दुःखद निधन झालं.

एकेकाळी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले जेष्ठ अभिनेता जयराम कुलकर्णी याचं आज दुःखद निधन झालं.

एकेकाळी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले जेष्ठ अभिनेता जयराम कुलकर्णी याचं आज दुःखद निधन झालं.

मंबई, 17 मार्च : एकेकाळी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले जेष्ठ अभिनेता जयराम कुलकर्णी याचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या. जयराम कुलकर्णी यांचा अल्प परिचय जन्म 17 ऑक्टोबर 1932 जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव. जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका त्यांना साकारायला मिळाली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच. जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला. कॉलेज शिक्षणा नंतर १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी लागली. नाटकात कामे करण्याची हौस असल्याने १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या बरोबरच ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला. चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम कुलकर्णी या समीकरणानेच प्रत्येक जण माझ्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ हेमा कुलकर्णी, तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून होत.
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या