मुंबई, 06 मार्च : अभिनेत्री जान्हवी कपूरचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीने 27 व्या वर्षात पदार्पण केलं असून तिच्यावर आज चाहते शुभेच्छांचा वर्षाव करतायत. बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड असलेल्या जान्हवीने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जान्हवीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, मिली, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. जान्हवीचा दोस्ताना-2, तख्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता आज जान्हवीनं वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नव्या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर साऊथच्या सुपरस्टारसोबत झळकणार आहे. जान्हवी ज्युनियर एनटीआर सोबत साऊथ चित्रपटात पदार्पण करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. आता यावर शिक्कामोर्तब झाला असून जान्हवीचा लूक समोर आला आहे. Janhvi Kapoor Networth: एकही हिट चित्रपट नाही तरी कोट्यवधींची मालकीण आहे श्रीदेवीची लेक; कमाई वाचून व्हाल थक्क ज्युनियर एनटीआर NTR30 चित्रपटात जान्हवी मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. जान्हवी कपूरच्या वाढदिवशी, NTR30 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा लूक रिलीज करत तिचे अधिकृतपणे स्वागत केले आहे. जान्हवीनेही या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे.
चित्रपटाची घोषणा शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ‘वादळातील शांतता #NTR30. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान्हवी कपूर आणि या कुटुंबात तुझे स्वागत. ’ या पोस्टमध्ये जान्हवी कपूर गुलाबी ब्लाउज आणि राखाडी आणि तपकिरी साडीत तलावाजवळ बसलेली दिसते. जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. पोस्टर शेअर करत तिने, ‘अखेर हे घडत आहे.’ असं लिहिलं आहे. बॉलिवूड सोडून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करताना जान्हवी खूप उत्सुक दिसत आहे. NTR30 च्या शूटिंगला या वर्षी 1 जानेवारीपासून सुरुवात झाली. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जान्हवीला ज्युनियर एनटीआर सोबत जोडले जाणे चाहत्यांना नक्कीच उत्साहित करणारे आहे, ही एक मोठी गोष्ट बनली आहे. रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरला या चित्रपटासाठी 3.5 कोटी रुपये मिळणार आहेत.
गेल्या पाच वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीसाठी ही मोठी कामगिरी आहे. विशेष म्हणजे, जान्हवीला तिचा पहिला चित्रपट ‘धडक’ साठी 60 लाख रुपये फी मिळाल्याची माहिती आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील तिची स्थिती गेल्या काही वर्षांत सुधारली आहे आणि जान्हवी सध्या बी-टाऊनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी कपूरची आई आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी या साऊथमधील अभिनेत्री होत्या आणि तिथून सुरुवात करून ती बॉलिवूडमध्ये आली. आणि आता जान्हवी बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर साऊथ इंडस्ट्रीकडे जात आहे. तिला आता नव्या रूपात पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहे