मुंबई, 9 जून : बॉलिवूडचे प्रसिद्ध प्रोड्युसर बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा ‘गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल’मुळे चर्चेत आली आहे. लॉकडाऊनमध्ये इतर सेलिब्रेटींप्रमाणे जान्हवी सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकतीच तिनं तिचा आगामी सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती दिली. पण याशिवाय सध्या तिची एक सोशल मीडिया पोस्ट सुद्धा व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिनं असा काही खुलासा केला आहे की तिचे चाहते सुद्धा चकीत झाले आहेत.
‘धडक’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘इथे तुलाच पाहत आहे बाळा.’ जान्हवीच्या या फोटो आणि कॅप्शननं सर्वांनाच गोंधळात टाकलं आहे. कोणालाच तिच्या या कॅप्शनचा अर्थ न समजल्यामुळे सर्वांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
सई ताम्हणकरवर बहीणच पडतेय भारी, दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, पाहा PHOTOS
जान्हवीच्या या पोस्टवर तिची बेस्ट फ्रेंड आणि डायरेक्टर राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषीनं सुद्धा कमेंट केली आहे. तिनं विचारलं, कोण बाळ? तुला खरंच बाळ हवं आहे. विशेष म्हणजे तिच्या या कमेंटला जान्हवीनं रिप्लाय सुद्धा केला आहे. यावर रिप्लाय करताना जान्हवीनं हो असं उत्तर दिलं आहे.
सोशल मीडियावर जान्हवीची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसह इतर बॉलिवूड सेलेब्सनी सुद्धा कमेंट केल्या आहेत. सध्या जान्हवी तिची बहीण खुशी कपूरसोबत टाइम स्पेंड करत आहे. तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा 'गुंजन सक्सेना बायोपिक' लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. याशिवाय तिच्याकडे ‘रूही अफ्जा’ आणि ‘तख्त’ हे सिनेमा आहेत.
‘प्लेन लड़का उड़ाए या लड़की, उसे पायलट ही कहते है’ पाहा जान्हवीचा नवा अवतार