मुंबई, 9 जून : मराठी सिनेमांसोबतच बॉलिवूड सिनेमांतही आपलं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिच्या बिकिनी फोटोंनी तर अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सईनं दमदार अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना तिनं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध केलं. तिच्या लुकवर अनेकजण फिदा आहेत. पण तुम्हाला माहित आहे की सई पेक्षा लुक आणि सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण तिला टक्कर देते.
सईचा सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच तिची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते. सईनं काही दिवसांपूर्वी तिच्या बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. पण तरीही या फोटोमध्ये तिची बहीणच भाव खाऊन जाते. सौंदर्याच्या बाबतीत सईची बहीणच तिच्यावर वरचढ ठरते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
सईनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि सईची ही बहीण सध्या खूप चर्चेत आली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या सिनेमांपेक्षाही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोशूटची चर्चाही बऱ्याचवेळा होताना दिसते. सई तिच्या अभिनयासोबतच मराठीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.
सईच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच कृती सेननं सोबत ‘मिमी’ या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. हा सिनेमा मराठीतील ‘मला आई व्हायचंय’चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात सईची महत्त्वपूर्ण भूमिका असून सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिच्या पायाला दुखापत सुद्धा झाली होती. मात्र आता लॉकडाऊनमुळे या सिनेमाचं शूटिंग रखडलं आहे.