मुंबई, 9 जून : अभिनेत्री जान्हवी कपूरनं धडक या सिनेमातून 2018 मध्ये बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर तिचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मागच्या काही काळापासून कारगील युद्धात सामील झालेल्या भारतीय पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक जोरदार चर्चा सुरू आहे आणि या सिनेमात त्यांची भूमिका जान्हवी साकारत आहे. या सिनेमासाठी जान्हवी प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमाचं प्रदर्शन कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अडकलं. पण आता मात्र हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात जान्हवीचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जान्हवी कपूर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यावेळी ती खूपच वेगळ्या अंदाजात आपल्यासमोर येत आहे. जान्हवीचा गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल हा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा माहिती स्वतः जान्हवीनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बॅकग्राऊंडला जान्हवीचा आवाज असून व्हिडीओमध्ये गुंजन सक्सेना यांच्या लाइफमधले काही हायलाइट्स दाखवण्यात आले आहेत.
ऐश्वर्याला म्हटलं आंटी, आलियाच्या स्टाइलवर कमेंट; या कारणांनी वादात अडकली सोनम
हा व्हिडीओ शेअर करताना जान्हवीनं लिहिलं, हा सिनेमा माझ्यासाठी फक्त सिनेमा नाही. हा एक प्रवास आहे ज्यानं मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. एक अशी मुलगी जिने सर्वांना साध्या सोप्या कृतीतून आपल्या स्वप्नाच्या मागे धावायला शिकवलं. हा प्रवास तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
जान्हवी कपूरचा हा सिनेमा लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स रिलीज होणार आहे. या सिनेमातून प्रेक्षकांसमोर गुंजन सक्सेना यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलं असून जान्हवी कपूर सोबतच या सिनेमात पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
सई ताम्हणकरवर बहीणच पडतेय भारी, दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, पाहा PHOTOS मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.