आईच्या आठवणीत जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट; हस्ताक्षरातील चिठ्ठी केली शेअर

आईच्या आठवणीत जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट; हस्ताक्षरातील चिठ्ठी केली शेअर

जान्हवी कपूरने (Janhavi kapoor) आपल्या आईच्या (Sridevi) आठवणीत एक हाताने लिहिलेली चिठ्ठी (Handwritten note shared) शेअर केली आहे. यामध्ये श्रीदेवीने आपल्या मुलीसाठी एक खास संदेश लिहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी: बॉलिवूडची चांदणी श्रीदेवी यांनी (Sridevi) तीन वर्षांपूर्वी याच दिवशी 24 फेब्रुवारी 2018 रोजी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाची (Death) बातमी समोर येताच संपूर्ण बॉलिवूडसह, चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. श्रीदेवीचं निधन झालंय, यावर विश्वास ठेवणंही चाहत्यांना अवघड गेलं होतं. एवढा मोठा चाहता वर्ग असणाऱ्या श्रीदेवी यांच्या मृत्यूला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. याप्रसंगी कुटुबीयांनी त्यांना चेन्नई याठिकाणी आदरांजली वाहिली आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आज पुन्हा एकदा आईच्या आठवणीने भावूक झाली आहे. तिने आईच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवीने आपल्या आईच्या आठवणीत एक चिठ्ठी (Handwritten note shared) शेअर केली आहे. या चिठ्ठीत लिहिलं आहे की, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, लब्बु, तू या जगातील सर्वात चांगलं बाळ आहेस'. या हस्ताक्षरावरून असं दिसतं आहे की, श्रीदेवीने जान्हवीसाठी ही चिठ्ठी लिहिली असावी. ही चिठ्ठी शेअर करताना जान्हवीने भावनिक होतं 'मिस यू' असं लिहिलं आहे.

श्रीदेवीचं जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' साठी खूप उत्सुक होत्या. आपल्या मुलीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची त्यांना प्रचंड इच्छा होती. परंतु जान्हवीचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर जान्हवीने काही दिवसांनी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं.

(वाचा -उर्वशीला बॉलिवूड गायकानं घातली होती लग्नाची मागणी; का दिला अभिनेत्रीनं नकार?)

दुबईतील एका हॉटेलच्या रुममधील बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. श्रीदेवीने तिच्या 51 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत सुमारे 300 चित्रपटांत काम केलं होतं. त्यांनी 'जुली' या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पहिला चित्रपट केला होता. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'झिरो' हा चित्रपट श्रीदेवी यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.

Published by: News18 Desk
First published: February 24, 2021, 5:12 PM IST

ताज्या बातम्या