मुंबई, 9 जून : अभिनेत्री सोनम कपूरला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून 1 दशकापेक्षा जास्त काळ उलटला आहे. या काळात तिनं तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनावर स्वतःची वेगळी छाप पाडली. भले ती केवळ स्वतःच्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेमा हिट करू शकलेली नाही मात्र बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सोनमचं नाव घेतलं जातं. पण या 13 वर्षांत सोनम तिच्या काही वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आज सोनमचा 35 वा वाढदिवस त्यानिमित्त जाणून घेऊयात तिच्या अशा स्टेटमेंट विषयी ज्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं होतं.
सोनम कपूरचा जन्म 9 जून 1985 ला मुंबईमध्ये झाला. आज सोनम 35 वर्षांची झाली. पण तिच्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेकदा असं झालं की तिच्या सिनेमांपेक्षा ती अनेकदा तिच्या स्टेटमेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खासकरून तिनं ऐश्वर्या राय आणि आलिया भट यांच्याबाबत केलेली वक्तव्य खूप चर्चेत आली होती आणि या दोघींच्या चाहत्यांचा रोषही तिनं ओढावून घेतला होता.
सई ताम्हणकरवर बहीणच पडतेय भारी, दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, पाहा PHOTOS
ऐश्वर्या रायला म्हटलं होतं आंटी
एकदा सोनम कपूरनं ऐश्वर्या राय बच्चनला आंटी म्हटलं होतं. ज्यामुळे ऐश्वर्याचे चाहते सोनमवर खूप नाराज झाले होते आणि सोशल मीडियावर यासाठी सोनमला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण त्यानंतर सोनमनं सावरुन घेत, आमच्यात खूप मोठी जनरेशन गॅप आहे आणि ऐश्वर्यानं माझ्या वडिलांसोबत सिनेमात काम केलं आहे. तर मी तर तिला आंटीच म्हणणार ना. असं म्हटलं होतं. मात्र तिच्या वक्तव्यावरुन खूप वाद झाले होते.
आलियाच्या स्टाइल स्टेटमेंटवर केली होती कमेंट
सोनम कपूर नेहमीच तिचा फॅशन सेन्स, स्वॅग आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र तिची दुसऱ्यांना फॅशन टीप्स देण्याची सवय काही सुटत नाही. असं करताना एकदा ती सोशल मीडियावर खूपच वाईट प्रकारे ट्रोल झाली होती. करण जोहरच्या टॉक शोमध्ये तिनं परिणीति चोप्रावर कमेंट करत म्हटलं होतं की, तिनं टाइट कपडे घालायला नको. तर दुसरीकडे तिनं आलियाच्या फॅशन सेन्सवर कमेंट केली होती. आलिया भटनं तिच्या वयाचा विचार करून कपडे घालायला हवे. असा सल्ला तिनं आलियाला दिला होता. ज्यामुळे आलियाच्या चाहत्यांनी सोनमला खूप ट्रोल केलं होतं.
प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा याला लागली होती मृत्यूची चाहूल?
लॉकडाऊनमध्ये सोनमनं पती आनंद आहुजासोबत दिल्लीमध्ये टाइम स्पेंड केला मात्र लॉकाडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर ती आता आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईला परतली आहे. याची माहिती तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती.
जॅकलिननं शेअर केले बेडरुम सेल्फी, फोटोमध्ये दिसला आतापर्यंतचा सर्वात BOLD लुक