मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Orry Halloween Party:रूमर्ड बॉयफ्रेंड ऑरीच्या पार्टीत जान्हवीचा जलवा, बोल्ड आणि ब्युटीफुल लुकने वेधलं लक्ष

Orry Halloween Party:रूमर्ड बॉयफ्रेंड ऑरीच्या पार्टीत जान्हवीचा जलवा, बोल्ड आणि ब्युटीफुल लुकने वेधलं लक्ष

फोटो

फोटो

ओरहान अवत्रमणी हा सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा आणि स्टारकिड्सचा आवडता व्यक्ती बनला आहे. कधी तो स्टार्सच्या पार्टीत दिसतो तर कधी स्टार्सकीड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून येतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 ऑक्टोबर-   ओरहान अवत्रमणी हा सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा आणि स्टारकिड्सचा आवडता व्यक्ती बनला आहे. कधी तो स्टार्सच्या पार्टीत दिसतो तर कधी स्टार्सकीड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून येतो. अजय देवगणच्या लेकीपासून सैफ अली खानच्या लेकीपर्यंत सर्वांनीच ओरहानसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तो सोशल मीडियावर ऑरी या नावाने ओळखला जातो. हिवाळा सुरु होताच बॉलिवूडमध्ये हॅलोविन पार्टीची सुरुवात होते. दिवाळी पार्टीनंतर आता सर्व स्टार्स हॅलोविन पार्टीमध्ये सहभाग घेत आहेत. नुकतंच ऑरीने एका भव्य हॅलोविन पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये जान्हवी कपूर, सारा अली खानपासून, आर्यन खान, अनन्या पांडे, शनाया कपूरसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते. सध्या त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतंच लोकप्रिय पापाराझी विरल भयानीने जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपला बेस्ट फ्रेंड ऑरीच्या हॅलोविन पार्टीमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे. ऑरी आणि जान्हवी कपूर यांची जवळीकता पाहून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा वारंवार पाहायला मिळतात. दरम्यान या पार्टीत सहभागी होत जान्हवीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या हॅलोविन पार्टीसाठी जान्हवी कपूरने ब्लॅक रंगाचा आऊटफिट निवडला होता. जान्हवीने ऑफ शोल्डर ब्लॅक वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तसेच तिने आपले केस मोकळे सोडले होते आणि डार्क शेडची लिपस्टिक लावली होती. यामुळे तिचा लुक अतिशय आकर्षक दिसत होता. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

(हे वाचा:Ananya Panday B'day: 24 वर्षांची अनन्या आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते इतकी फी )

ऑरीच्या या पार्टीसाठी बॉलिवूड किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यनसुद्धा फुल्ल टशनमध्ये सहभागी झाला होता. त्याचाही एक व्हिडीओ विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आर्यन खानने ओरहान अवत्रमणीच्या हॅलोविन पार्टीसाठी काळी पँट, काळा टी-शर्ट आणि काळे जॅकेट परिधान केले होते. यासोबत त्याने चांदीची साखळीही घातली होती. या स्टारकिडच्या लुकमध्ये काही वेगळं होतं तर ते म्हणजे काजळ. ऑरीच्या हॅलोवीन पार्टीसाठी आर्यनने आपल्या डोळ्यात काजळ घातला होता, काहीतरी हटके म्हणत आर्यन खानने आपला टशन दाखवला. आता हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आर्यन खानचा हा लुक पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स त्याची तुलना वडील शाहरुख खानसोबत करत आहेत. अनेकजण शाहरुखच्या रईसच्या लुककचाही उल्लेख करताना दिसत आहेत. 2017 मध्ये रईसमध्ये शाहरुखने डोळ्यात काजळ घातलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत पाकिस्तानी स्टार माहिरा खानही होती. आर्यन खानच्या लुक्सची तुलना शाहरुख खानशी केल्याची ही पहिलीच वेळ नाहीय. अनेक चाहते आर्यन खान अगदी आपल्या वडिलांसारखा दिसत असल्याचं वारंवार म्हणतात.

तसेच अभिनेत्री अनन्या पांडेदेखील या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. अनन्याने यावेळी पिंक आणि क्रीम शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. हातात छोटीशी बॅगही अडकवलेली दिसली. अभिनेत्रीचा हा लुक 'कभी ख़ुशी कभी गम' मधील करीना कपूरच्या लुकसोबत मिळता-जुळता होता. तसेच अभिनेत्री शनाया कपूरने डिस्ने प्रिन्सेससारखा आपला लुक कॅरी केला होता. या हॅलोविन पार्टीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First published:

Tags: Ananya panday, Aryan khan, Bollywood, Entertainment, Janhavi kapoor