सध्या बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अनेक स्टारकिड्स ट्रॅडीशनल अंदाजात वावरताना दिसून येत आहेत.
2/ 8
चाहत्यांना या स्टारकिड्सबाबत आकर्षण वाटतं असतं. त्यामुळे या स्टारकिड्सना मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान या स्टारकिड्ससोबत एक अनोळखी हॅन्ड्सम हंकसुद्धा प्रचंड चर्चेत आला आहे.
3/ 8
या हॅन्ड्सम हंकचं नाव ओरहान अवत्रमणी असं आहे. मात्र त्याला सोशल मीडियावर सर्वजण ऑरी या टोपणनावानेच ओळखतात.
4/ 8
ऑरी हा सतत जान्हवी कपूर, ख़ुशी कपूर, सारा अली खान, न्यासा देवगण अशा अनेक स्टारकिड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करतांना, पार्टी करतांना दिसून येतो.
5/ 8
या सर्व स्टारकिड्सच्या नेहमी सोबत असणारा हा ऑरी नेमका कोण आहे? असा प्रश्न अलीकडे अनेकांना पडत आहे. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
6/ 8
ऑरी हा एक मुंबई बेस्ड सोशल एक्टिव्हिस्ट आहे. त्याने सारासोबत कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला प्रोफेशनल ऍनिमेटर व्हायचं आहे.
7/ 8
ऑरीचे बॉलिवूड सेलेब्रेटीजच नव्हे तर हॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा खास मित्र आहेत. त्याचे किम कर्दाशियन आणि तिच्या बहिणीसोबत चांगले संबंध आहेत.
8/ 8
इतकंच नव्हे तर तो काईली जेनरच्या फारच जवळचा मित्र आहे. तो सतत या हॉलिवूड स्टार्ससोबत फोटो शेअर करत असतो. त्याचे अनेक मोठमोठ्या उद्योगपतींसोबत चांगले संबंध आहेत. तो ईशा अंबानीचाही खास मित्र आहे. अशाप्रकारे एक स्टारकिड नसूनसुद्धा ऑरी चर्चेत असतो.