मुंबई,2 एप्रिल- बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटींचे रिलेशनशिप्स ही एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटींच्या रिलेशनशिपच्य बातम्या समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर, परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेयर्सच्या आणि लग्नाच्या बातम्यांनी जॉर्ड धरला आहे. दरम्यान आणखी एक अभिनेत्री अशी आहे जिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर होय. इतकंच नव्हे तर जान्हवी कपूरच्या नात्याला वडील बोनी कपूर यांनीही परवानगी दिल्याचं म्हटलं जात आहे.
जान्हवी कपूर फारच कमी वेळेत बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री बनली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरसुद्धा तिची मोठी फॅनफॉलोईंग आहे. चित्रपट, स्टाईल, लुक्स आणि लव्ह लाईफ या प्रत्येक गोष्टींमुळे जान्हवी सतत चर्चेत असते. जान्हवी कपूरच्या रिलेशनशिपबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. जान्हवीचं नाव अनेकवेळा ऑरीसोबत जोडलं जात होतं . मात्र ते दोघे फक्त चांगले मित्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जान्हवी कपूर आता पुन्हा एकदा आपल्या एक्स-बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
(हे वाचा:खासदार अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? इन्स्टा पोस्टने एकच खळबळ )
नुकतंच 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चं उदघाटन करण्यात आलं. या सोहळ्यात सिनेसृष्टीपासून राजकीय क्षेत्रापर्यंत अनेक दिग्गज सहभागी झाले होते. मात्र यावेळी एका जोडीला पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. ही जोडी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर आणि जान्हवीचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडिया होय. या दोघांनी या सोहळ्यात एकत्र एन्ट्री घेतली होती. दोघांनी मीडियाला पोजदेखील दिल्या. या दोघांमध्ये फारच छान बॉन्डिंग पाहायला मिळालं.
View this post on Instagram
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोघांच्या जोडीमध्ये असं काय खास होतं? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बोनी कपूर यांची मुलगी-अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांच्या नात्याला वडील बोनी कपूर यांनी परवानगी दिली असून येत्या काळात दोघेही लग्नगाठ बांधतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच बोनी कपूर यांच्यासोबत शिखरने कार्यक्रमात हजेरी लावल्याने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला का असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.
कोण आहे शिखर पहाडिया?-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही काळाने त्यांचा ब्रेकअप झाला होता. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेचा नातू आहे. जान्हवीसोबतच्या रिलेशनशिपमुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकत्र फिरत असल्याने हे दोघे पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.