जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / खासदार अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? इन्स्टा पोस्टने एकच खळबळ

खासदार अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? इन्स्टा पोस्टने एकच खळबळ

अमोल कोल्हे करणार अभिनेत्री अमृता खानविलकरशी लग्न?

अमोल कोल्हे करणार अभिनेत्री अमृता खानविलकरशी लग्न?

Amol Kolhe-Amruta Khanvilkar News: खासदार -अभिनेते अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 एप्रिल- खासदार -अभिनेते अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. मात्र सध्या त्यांनी अशी एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून एकच खळबळ माजली आहे. यामध्ये अमोल कोल्हे अभिनेत्री अमृता खानविलकर सोबत करणार लग्न असा उल्लेख करण्यात आला आहे. ही पोस्ट पाहून सर्वच चकित होत आहेत. पाहूया या पोस्टमागे नेमकं कारण काय आहे. अभिनेते अमोल कोल्हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि अभिनय क्षेत्रातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. चाहतेही त्यांच्या पोस्टला भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात. दरम्यान अमोल कोल्हे यांनी असं काही पोस्ट केलं आहे, जे पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. (हे वाचा: विवाहित गायकाच्या प्रेमात वेडी होती मीनाक्षी शेषाद्री; पत्नीला समजताच उध्वस्त झाला संसार ) अमोल कोल्हे यांनी एक वृत्त लिहिलेला फोटो शेअर केला आहे. या वृत्तामध्ये लिहलं आहे. ‘राष्ट्रवादीचे खासदार-अभिनेते अमोल कोल्हे पत्नीला कंटाळले आहेत. ‘वाजले की बारा’ फेम अमृता खानविलकरच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर आपल्या पतीला घटस्फोट देऊन विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे. या लग्नाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही उलट अमृताशी लग्न करुन मीही उपमुख्यमंत्री होईन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकरण्यांना असे म्हटले जाते.

जाहिरात

अमोल कोल्हे यांनी हे वृत्त शेअर करत लिहलंय, ‘‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं?नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!’’

News18लोकमत
News18लोकमत

अर्थातच अमोल कोल्हे यांनी शेअर केलेलं हे वृत्त काही लोकांनी एप्रिल फुल म्हणून केलं आहे. ज्याची माहिती स्वतः कोल्हेंनी देत मजेशीर कॅप्शन लिहलं आहे. अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर सेलिब्रेटी आणि चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात