मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'महाराष्ट्र शाहीर' रिलीज होण्याआधीच मोठी घोषणा! 'जय जय महाराष्ट्र माझा' ठरलंं 'राज्यगीत'

'महाराष्ट्र शाहीर' रिलीज होण्याआधीच मोठी घोषणा! 'जय जय महाराष्ट्र माझा' ठरलंं 'राज्यगीत'

jai jai maharashtra majha

jai jai maharashtra majha

शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधीच महाराष्ट्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी :  'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्रचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. राजा बडे यांनी हे गाणं लिहिलं आहे. इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडवून देणाऱ्या या गाण्याला शाहिर साबळे यांचा भारदस्त आवाज लाभला. आज कित्येक वर्षांनी देखील जय जय महाराष्ट्र माझा हे शाहिर साबळेंच्या आवाजातील गाणं अंगावर शहारे आणतात. शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा येत्या 28 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शाहिर प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच शाहिरांचं गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयापैकी हा एक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. त्यानुसार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल, असं घोषित करण्यात आलं.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023ला या  निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Shahir : 'अगंबाई अरेच्चा'तील ही चिमुकली आठवतेय का? 'महाराष्ट्र शाहीर' मध्ये साकारणार महत्वाची भूमिका

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील प्रत्येक राज्याचं एक गीत असावं असं ठरलं आहे. त्यानुसार महाराष्ट्र गीतासाठी एकूण 3 गीतांची निवड करण्यात आली होती. त्यातील 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली.

शाहिर साबळेंच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहिर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहिर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून सिनेमाची पुढील प्रोसेस सुरू झाली आहे. सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी शाहिर साबळेंची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत स्वत: केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे दिसणार आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news