'तारक मेहता...'च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, 'या' दिवशी परतणार दयाबेन

'तारक मेहता...'च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, 'या' दिवशी परतणार दयाबेन

मागच्या काही काळापासून दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दयाबेननं हा शो सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : टीव्हीवर नेहमीच टीआरपीमध्ये नंबर वन राहणारा कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच बदलातून जात आहे. सर्वात आधी डॉक्टर हाथी यांची भूमिका साकरणारा अभिनेता बदलला. त्यानंतर लगेचच दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दयाबेननं हा शो सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रेग्नन्सीमुळे दिशानं काही दिवसांसाठी या मालिकेतून ब्रेक घेतला होता पण या शोमध्ये परतण्यासाठी मात्र तिनं मानधन म्हणून बरीच मोठी रक्कम मागितल्याचं समोर आलं. मात्र मेकर्सनी तिची ही मागणी फेटाळली. त्यामुळे दयाबेन या शोमधून बरेच दिवस गायब आहे. मात्र आता या शोच्या चाहत्यासाठी खूशखबर आहे. लवकरच दयाबेनची या शोमध्ये वापसी होणार आहे.

लोकांचं भविष्य सांगणाऱ्या जोतिष्याची पोलखोल, 10 हजाराच्या प्रश्नावर शोमधून बाहेर

सुत्रांच्या माहितीनुसार तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पात्र दयाबेन लवकरच परत येणार आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरच्या मध्ये दिशाची या शोमध्ये एंट्री होणार आहे. रिपोर्टनुसार प्रोड्युसर असित मोदी यांनी शेवटी दिशाच्या अटी मान्य करत या शोमध्ये परतण्याची तयारी केली आहे. तसेच दिशानंही प्रोडक्शन हाउसच्या अटी मान्य केल्या आहेत. या आधी पैशावरून दिशा आणि प्रोड्यूसर यांच्यात वाद असल्याचं बोललं जात होतं.

याआधी दिशा वकानीच्या बदली नवी दयाबेन शोधण्याचं काम सुरू होतं. मात्र या भूमिकेसाठी दिशापेक्षा जास्त चांगलं काम करू शकेल असं कोणी सापडली नाही.  मात्र नुकत्याच दाखवलेल्या एका एपिसोडमध्ये दिशाच्या परत येण्याची हिंट देण्यात आली आहे. जेठालाल गणेशोत्सवाच्या वेळी दयाबेनला मिस करताना दाखवण्यात आलं आहे. ज्यानंतर लवकरच दयाबेन या शोमध्ये परणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Houseful 4 Trailer : अक्षय कुमारच्या तुफान कॉमेडीला हॉररचा तडका!

या शोमध्ये काही दिवसांपूर्वी नव्या सोनूची एंट्री झाली होती. त्याअगोदरही मेकर्सनी काहीसा असाच माहोल तयार केला होता. हा शो मागच्या 11 वर्षांपासून सुरू आहे. दिशा वकानी या शोमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे मागच्या बऱ्याच काळापासून तिच्या शोमध्ये परतण्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.

KBC-11: मुंबईतील शिक्षिका देऊ शकली नाही तिसरीच्या अभ्यासक्रमातील प्रश्नाचं उत्तर

================================================================

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या