मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अखेर जॅकलीनला दिलासा! 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

अखेर जॅकलीनला दिलासा! 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीन फर्नांडिस

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 15 नोव्हेंबर : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अखेर जॅकलीनची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

जॅकलीन फर्नांडिसला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्रीला जामिनासाठी मंजूर करण्यात आला आहे. सर्व नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. जॅकलीन फर्नांडिसच्या जामिनाची मुदत 10 नोव्हेंबर रोजी संपली. याप्रकरणी न्यायालयाने 11 नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता जॅकलिनला मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिची दोन लाखांच्या शॉरिटी बॉन्डवर निर्दोष मुक्तता केली आहे.

हेही वाचा -  सारासोबत डेटिंगच्या चर्चांवर शुभमन गिले सोडलं मौन, म्हणाला..,.

जॅकलिन फर्नांडिसवर अनेक गंभीर आरोप आहेत, त्यापैकी एक म्हणजे तिला सुकेश चंद्रशेखर या ठगाच्या काळ्या कृत्यांची माहिती होती आणि तरीही ती त्या ठगांकडून महागड्या भेटवस्तू घेत असे. जॅकलीन फर्नांडिसच्या वकिलाने कोर्टात बचाव करताना ईडीचे आरोप साफ फेटाळले होते. ते म्हणाले होते की, अभिनेत्रीने नेहमीच तपासात सहकार्य केले आहे. उलट ईडीने नेहमीच अभिनेत्रीला त्रास दिला आणि खोटे आरोप केले.

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूडची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. त्यामुळे तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. मात्र आता पटियाला हाऊस कोर्टाकडून जॅकलीनला दिलासा मिळाला आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Jacqueline fernandez