मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीनच्या अडचणींत वाढ, वकिलांनी केला मोठा खुलासा

Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीनच्या अडचणींत वाढ, वकिलांनी केला मोठा खुलासा

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली आहे. आता याप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. नुकताच जॅकलिन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 18 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली आहे. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव समोर आल्यापासून तिच्या अडचणी वाढत चालल्याचं दिसत आहे. आता याप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. नुकताच जॅकलिन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी परराष्ट्र कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस आरोपी बनवून आरोपपत्र दाखल केले होते. यासंदर्भात आता जॅकलीनच्या वकिलांनी एक खुलासा केला आहे. 'आतापर्यंत आम्हाला फक्त एवढीच माहिती मिळाली आहे की ईडीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्याप यावर ईडीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. माझ्या क्लायंटला अद्याप अहवालाची कोणतीही प्रत मिळालेली नाही. फक्त मीडिया रिपोर्टच्या आधारावर माझ्या क्लायंटला आरोपी म्हटलं जात असेल तर हे खूप दुःखादायक आहे', असा खुलासा जॅकलीनच्या वकिलांनी केला आहे. हेही वाचा -  Actress Tabu: बॉक्स ऑफिस कलेक्शनसंदर्भात तब्बूचं आश्चर्यकारक वक्तव्य, म्हणाली आपले पैसे.... सुकेश चंद्रशेखर प्रकरणी माझी क्लायंट जॅकलीननं संपूर्ण सहकार्य केलं आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक चौकशीत जॅकलीननं सहभाग नोंदवला आहे. तिच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तीनं तपास यंत्रणेला दिली आहे. त्यामुळे आता जॅकलीनच्या या प्रकरणी अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं दिसत आहे. दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला 10 कोटींचे गिफ्ट दिले होते. जॅकलीनला दिलेल्या गीफ्टचे पैसे सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातील होते. हे अभिनेत्रीला माहिती असतानाही तिनं भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी कोणती महत्त्वाची अधिकृत माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Jacqueline fernandez, Money laundering

पुढील बातम्या