‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुरने बाबांच्या वाढदिवशी घेतली नवी चारचाकी गाडी

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुरने बाबांच्या वाढदिवशी घेतली नवी चारचाकी गाडी

आपला अभिनय व चिकाटीच्या जोरावर शारिरीक व्यंगावर मात करीत तो इथपर्यंत आला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मार्च : 'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी'वरील मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेल्या अंकुर वाढवे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक खास फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

आपण स्वत:च्या कमाईतून खरेदी केलेलं घर आणि पहिली गाडी नेहमीच खास असते. काही दिवसांपूर्वी निलेश साबळे याने मुंबईत  स्वत:चं घर खरेदी केलं आहे, त्यानंतर अकुंर वाढवेनेही नवी कोरी करकरीत चार चाकी गाडी खरेदी केली व हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अंकुरनं त्यांच्या वडिलांच्या वाढदिवशी चारचाकी गाडी घरासमोर उडी केली आहे आणि याचा अत्यंत आनंद असल्याची भावना व्यक्त केली आहे.

'चला हवा येऊ द्या' या मालिकेच्या निमित्ताने अंकुर घराघरांत पोहोचला. त्यानिमित्ताने त्याच्यातील अभिनयाची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.  मात्र अंकुर चांगला कवीदेखील आहे. आताच 'पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी' हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. आतापर्यंत विविध नाटकं आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपला अभिनय व चिकाटीच्या जोरावर शारिरीक व्यंगावर मात करीत तो इथपर्यंत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2020 09:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading