मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: रकुल प्रीतआधी भूमि पेडणेकरच्या प्रेमात होता जॅकी भगनानी; अशी होती दोघांची लव्हस्टोरी

HBD: रकुल प्रीतआधी भूमि पेडणेकरच्या प्रेमात होता जॅकी भगनानी; अशी होती दोघांची लव्हस्टोरी

भिनेता जॅकी भगनानीचं   (Jacky Bhagnani)    बॉलिवूडशी  (Bollywood)  घट्ट नातं आहे. तो चित्रपट निर्माते वासू भगनानी   (Vasu Bhagnani)  यांचा मुलगा आहे. त्यानं काही मोजक्या चित्रपटांमध्ये कामही केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 डिसेंबर- अभिनेता जॅकी भगनानीचं   (Jacky Bhagnani)    बॉलिवूडशी  (Bollywood)  घट्ट नातं आहे. तो चित्रपट निर्माते वासू भगनानी   (Vasu Bhagnani)  यांचा मुलगा आहे. त्यानं काही मोजक्या चित्रपटांमध्ये कामही केलं आहे. अभिनयासोबतच तो चित्रपट निर्मितीशीही जोडलेला आहे. आज, 25 डिसेंबरला तो आपला 37 वा वाढदिवस   (Jacky Bhagnanis 37 th Birthday Today)  साजरा करत आहे. काही काळापूर्वी भूमि पेडणेकरसोबतच्या   (Bhumi Pednekar)  अफेअरमुळेही तो बराच चर्चेत आला होता. आज आपण त्याच्या याच अनटोल्ड लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत.

जॅकी भगनानीचा जन्म 25 डिसेंबर 1984 मध्ये कोलकत्ता येथे झाला होता. अभिनय क्षेत्रात तो अजूनही सक्रिय आहे. परंतु त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. 2009 मध्ये आलेल्या 'कल किसने देखा' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. आज जॅकी प्रोड्युसर म्हणून चित्रपट क्षेत्रात वावरत आहे.

अभिनेता जॅकी भगनानीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं आहे. परंतु अभिनेत्री भूमि पेडणेकरसोबतचं त्याचं अफेअर सर्वाधिक चर्चेतआलं होतं. सोशल मीडियावर या जोडीच्या प्रचंड चर्चा झाल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे दररोज रोज एकत्र जिममध्येजात असत. ते अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसले आहेत.

(हे वाचा:Radhe Shyam Trailer मध्ये पूजा हेगडेनं प्रभाससोबत दिले बोल्ड सीन...)

जॅकी आणि भूमिचं नातं केवळ मैत्रीपुरतं मर्यादित नव्हतं. तरीही दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. आणि कधीही काहीही सांगितलं नव्हतं. अभिनेत्री भूमि पेडणेकरनं एकदा एका मुलाखतीत तिच्या अफेअरबद्दल मोकळेपणानं बोललं होतं. अभिनेत्रीनं सांगितलं होतं की तिनं अनेकांना डेट केलं आहे.भूमी म्हणाली होती, 'मी सुंदर आणि मॉडर्न आहे. मी अनेकांना डेट केलं आहे. माझ्या एक्स बॉयफ्रेंड्सशी माझी चांगली मैत्री आहे. भूमि आणि जॅकीचं नातं कालांतराने कमकुवत झालं. आणि नंतर ते वेगळे झाले. लोकांनी त्यांच्या अफेअरबद्दल बोलणंही बंद केलं. अभिनेता जॅकी भगनानी सध्या रकुल प्रीत सिंहला डेट करत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment