मुंबई, 9 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात सगळीकडेच लॉकडाऊन करण्यात आलं. ज्यामुळे सर्वांनाच घरी राहावं लागलं आहे. नेहमी बीझी शेड्यूलची तक्रार करणारे बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा सध्या घरी असून आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. जवळपास सर्वजण सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. अशात त्याचे फोटो आणि व्हिडीओे व्हायरल होत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती तिच्या पतीच्या तक्रारी ऐकून त्याच्यावर रागावलेली दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या नवऱ्याचं आलू पराठ्यावरून भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत की, शिल्पा शेट्टी तिच्या नवऱ्याला आलू पराठा खायला देते. तो पाहिल्यावर नवरा तिला विचारतो यात आलू तर कुठे दिसतच नाही. त्यावरून या दोघांमध्ये भांडण होतं आणि शिल्पा त्याच्या सुनावते, काश्मिरी पुलावात कधी तुला काश्मीर दिसलं आहे? कधी बनारसी साडीमध्ये बनारस दिसतं? तिचा हा अवतार पाहून तिचा नवरा हतबल झालेला दिसतो.
अर्थात शिल्पाचं तिच्या नवऱ्याशी काही खरंच भांडण झालेलं नाही. तर हा एक टिकटॉक व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. शिल्पाच्या चाहत्यांनाही टिकटॉकवरील तिचा हा अंदाज आवडताना दिसत आहे. शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकर निकम्मा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. नेहमीच मेकअपशिवाय राहते ही अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात ‘आजचा दिवस खास आहे..’ इरफान खानच्या आठवणीत दीपिका झाली भावूक, शेअर केली ही कविता

)







