Home /News /entertainment /

महाराष्ट्राचा डिस्कस-थ्रो चॅम्पियन होता CID फेम ‘दया’, या कारणामुळे वळला अभिनयाकडे

महाराष्ट्राचा डिस्कस-थ्रो चॅम्पियन होता CID फेम ‘दया’, या कारणामुळे वळला अभिनयाकडे

एसीपी प्रद्युमन यांचा 'दया दरवाजा तोड दो!' हा डायलॉग नक्कीच तुम्हाला आठवत असेल. तर या दयाचा 11 डिसेंबर 1969 रोजी, म्हणजे आजच्याच दिवशी कर्नाटकात दयाचा जन्म झाला होता.

मुंबई, 11 डिसेंबर: टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे दयानंद शेट्टी. हे नाव वाचून तुम्हाला तो कदाचित आठवणार नाही, पण त्याचं स्क्रीनवरील नाव सांगितल्यानंतर तुम्हाला तो चटकन आठवेल. दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) म्हणजेच, ‘सीआयडी’ मालिकेतील सीनियर इन्स्पेक्टर (CID Daya) दया! एका किकमध्ये दरवाजा तोडण्याची त्याची विशिष्ट स्टाईल ही प्रेक्षकांमध्ये अगदीच लोकप्रिय आहे. यातील एसीपी प्रद्युमन यांचा 'दया दरवाजा तोड दो!' हा डायलॉग नक्कीच तुम्हाला आठवत असेल. तर या दयाचा 11 डिसेंबर 1969 रोजी, म्हणजे आजच्याच दिवशी कर्नाटकात दयाचा जन्म झाला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त (Dayanand Shetty Birthday) त्याच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डिस्कस-थ्रो चॅम्पियन आहे दया सध्या एक प्रसिद्ध अभिनेता असलेले दयानंद हा आधी एक खेळाडू होता. डिस्कस थ्रो आणि शॉर्ट पुट या खेळांमध्ये त्याने विशेष प्रावीण्य (Dayanand Shetty Discus throw) प्राप्त केले आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1996 साली महाराष्ट्राचा डिस्कस थ्रो चॅम्पियन होण्याचा मानही त्याने पटकावला आहे. मात्र, यानंतर झालेल्या एका दुखापतीमुळे क्रीडा जगताशी दयानंदचा संपर्क तुटला. त्यानंतर मग त्याने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. हे वाचा-48 वर्षांच्या Malaika Arora ने केलं असं Bold फोटोशूट, की...सीआयडी’मुळे पोहोचला घराघरात खेळाडू असल्यामुळे त्याची तब्येत उत्तम होतीच. शिवाय अभिनय कौशल्यासोबतच आडदांड शरीरयष्टीही त्याला लाभली आहे. याचा फायदा त्याला ‘सीआयडी’ मालिकेत भूमिका मिळवण्यासाठी झाला. लाथ मारून दरवाजा उघडण्याच्या शैलीसोबतच, ‘जब दया का हाथ पडता है, तो मुंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है!’ हा त्याचा डायलॉगही (CID Daya famous dialogue) बराच प्रसिद्ध झाला. 1998 साली दयानंदने ‘सीआयडी’ मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यानंतर कित्येक वर्षांपर्यंत तो या मालिकेतील आघाडीचा कलाकार राहिला. त्याची या मालिकेतील दरवाजा तोडायची स्टाईल (Daya Door opening style) एवढी प्रसिद्ध झाली, की पुढे ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटातही दयाला पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत (Daya in Singham Returns) याच प्रकारे दरवाजा तोडताना दाखवण्यात आले. एका मुलाखतीत दयानंद म्हणाला होता, की त्याने जर असे किती दरवाजे तोडले याची नोंद ठेवली असती; तर कदाचित गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव नोंदवलं गेलं असतं. हे वाचा-विकी-कतरिनाच्या घरातील त्या आवाजाला वैतागली अनुष्का; नवजोडप्याला दिला खास मेसेज उत्कृष्ट डान्सरही आहे दयानंद एक खेळाडू आणि उत्तम फायटर असण्यासोबतच दयानंद एक उत्कृष्ट डान्सरही आहे. ‘झलक दिखला जा’ (CID Daya Dance) आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअलिटी शोजमध्येही तो झळकला आहे. यासोबतच ‘सिंघम रिटर्न्स’ व्यतिरिक्त ‘दिलजले’, ‘जॉनी गद्दार’ अशा चित्रपटांमध्येही (CID Daya films) त्याने काम केले आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या