जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sidharth-Kiara Wedding : कियारा अडवाणीची बेस्ट फ्रेंड आहे अंबानींची लेक; लग्नात येणार कि नाही याकडेच सर्वांचं लक्ष

Sidharth-Kiara Wedding : कियारा अडवाणीची बेस्ट फ्रेंड आहे अंबानींची लेक; लग्नात येणार कि नाही याकडेच सर्वांचं लक्ष

कियारा आणि ईशा अंबानी

कियारा आणि ईशा अंबानी

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या जोडप्याच्या लग्नाला फक्त कुटुंब आणि मित्रच उपस्थित राहणार आहेत. शाहिद कपूर, मीरा राजपूत, मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर यांना सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पण सध्या कियाराच्या एका मैत्रिणीची खूपच चर्चा आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 फेब्रुवारी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीला ओळखलं जातं. गेल्या अनेक दिवसापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता सध्या दोघे लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. हे सेलिब्रेटी कपल येत्या  ६ फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील रॉयल सूर्यगड पॅलेस हॉटेलमध्ये 5 ते 6 फेब्रुवारीदरम्यान हा विवाहसोहळा पार पडणार आहे.  या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. या दोघांचे लग्न पाहायची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. या जोडप्याच्या लग्नाला फक्त कुटुंब आणि मित्रच उपस्थित राहणार आहेत. शाहिद कपूर, मीरा राजपूत, मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर यांना सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पण सध्या कियाराच्या एका मैत्रिणीची खूपच चर्चा आहे. कियाराने अनेकदा ईशा अंबानी पिरामल तिची सर्वात जुनी मैत्रिण असल्याचं सांगितलं आहे. 2018 मध्ये कियारा अडवाणीने ईशा अंबानीच्या एंगेजमेंटवर एक खास नोट लिहिली होती. बालपणीचे अनमोल फोटो शेअर करत कियाराने पोस्ट केले होते, ‘असे काही लोक आहेत जे तुमच्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत जीवन जगता. माझी सर्वात जुनी मैत्रीण, आजही तितकीच काळजी घेणारी, विनम्र मैत्रीण माझी इशू आज नवी सुरुवात करणार आहे! कायम तुझी अलीयु.’ हेही वाचा - Milind Gawali : अनिरुद्धच्या पात्राला कंटाळले मिलिंद गवळी? म्हणाले ‘हल्ली तो खूपच डोक्यात जातो…’ कियारा आणि इशा लहानपणापासून एकमेकींना ओळखतात. या दोघींचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कियारा आजवर अनेकदा ईशा अंबानीबद्दल खुलेपणाने बोलली आहे. ईशा अंबानीच्या लग्नात देखील कियारा उपस्थित झाली होती. त्यामुळे आता ईशा अंबानी आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या सिड कियारा च्या लग्नाला येणार कि नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

News18

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची जोडी प्रचंड पसंत केली जाते. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यांची जोडीसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटानंतर कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करु लागले होते. या दोघांनी सुरुवातीला आपलं नातं लपवलं होतं.

News18लोकमत
News18लोकमत

मात्र आता हे दोघेही एकत्र सोबत फिरताना आणि व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून येतात.गेल्यावर्षीपासून कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. परंतु असं झालं नाही. मात्र या नव्या वर्षात अनेक सेलिब्रेटी कपल्स लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलने लग्नगाठ बांधत बी टाऊनमध्ये लग्नसराईला सुरुवात केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात