मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सारा अली खान आणि विजय देवरकोंडा बॉलिवूडमधलं नवं जोडपं? पुन्हा दिसले एकत्र

सारा अली खान आणि विजय देवरकोंडा बॉलिवूडमधलं नवं जोडपं? पुन्हा दिसले एकत्र

सारा अली खानने (Sara Ali Khan) अलीकडेच व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine day) दिवशी तिचा एक फोटो दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाबरोबर (Vijay deverakonda) शेअर केला होता. आता ती पुन्हा विजय देवरकोंडासोबत एका पार्टीत दिसली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 फेब्रुवारी : बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सारा अली खान (Sara Ali khan) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान तिच्या 'कुली नंबर वन' (Coolie no. 1) चित्रपटामुळे चर्चेत होती. पण आता ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे (Personal Life) चर्चेत आली आहे. अलीकडेच व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine day) दिवशी सारा अली खानने तिचा एक फोटो दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाबरोबर (Vijay deverakonda) शेअर केला होता. त्यामुळे दोघंही रिलेशनशिपमध्ये (Relationship) असल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसली आहे. त्यामुळे सारा आणि विजय देवरकोंडा रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे.

अलीकडेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतीच एक हाऊस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीसाठी सारा अली खानही आली होती. यापूर्वी साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विजयसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. आणि आता ही जोडी मनीष मल्होत्राच्या पार्टीत एकत्र दिसली आहे. त्यामुळे हे दोघं बॉलीवूडची नवीन जोडी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

(वाचा - आणखी एका स्टारकिड्सचं मनोरंजन विश्वात पाऊल; दिसणार पोलिसांच्या भूमिकेत)

मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान आणि विजय देवरकोंडा या जोडीनं मनीष मल्होत्राच्या पार्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पार्टीत सारा आणि विजय खूप वेळ एकत्र दिसले आहेत. सारा आणि विजयची वाढती जवळीक पाहता, त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. पण याबाबत कोणीही जाहीरपणे काहीही सांगितलं नाही.

(वाचा - शाहिद नव्हे या सेलिब्रिटीवर होतं पहिलं प्रेम; मिरानं उघड केलं आपलं गुपित)

विजय देवरकोंडा 'लिगर' (Liger) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खानला विजय देवरकोंडाबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मनीष मल्होत्राच्या या पार्टीत करण जोहरही होता. करण जोहरच्याच लिगर चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Love story, Star celebraties, Vijay deverakonda