मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Indian Idol 12 : पवनदीप झाला विजेता? ट्रॉफी आणि चेकचा फोटो व्हायरल

Indian Idol 12 : पवनदीप झाला विजेता? ट्रॉफी आणि चेकचा फोटो व्हायरल

शोचा स्पर्धक पवनदीप (Pawndeep Rajan) हातात ट्रॉफी घेतलेला दिसत आहे. तसेच 25 लाखांचा चेक देखील दिसत आहे. त्यामुळे पवनदीप विजेता झाला का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

  • Published by:  News Digital
मुंबई 15 ऑगस्ट : सोनी टीव्ही (Sony Tv) वरील लोकप्रिय रिॲलिटी singing शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) चा आज ग्रँड फिनाले (Grand Finale) होणार आहे. पण त्याआधीच शोच्या विनरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत शोचा स्पर्धक पवनदीप (Pawndeep Rajan) हातात ट्रॉफी घेतलेला दिसत आहे. तसेच 25 लाखांचा चेक देखील दिसत आहे. त्यामुळे पवणदीप विजेता झाला का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. हा फोटो पाहून अनेकांचा गैरसमज झाला आहे. मात्र हा फोटो पूर्णपणे फेक असल्याच समोर आलं आहे. जर हा फोटो नीट पाहिलं तर त्यावर 15 लाख रुपये किंमत लिहिली आहे. याशिवाय तारीख 15 मे अशी आहे. त्यामुळे हा फोटो फसवा असल्याचं लक्षात येतं.
त्यामुळे अनेक युझर्सनी देखील कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. तर काहींनी लिहिलं की अशा फोटोंचा काही उपयोग नाही काही वेळातच खरा विजेता कोण हे जाहीर होईल. ते काहींनी लिहिलं की विजेता पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. तर काही पवणदीपच्या चाहत्यांनी त्याला विजेता म्हणून घोषित केलं आहे.

Rhea Kapoor wedding: ना मेहंदी, ना संगीत! साध्या पद्धतीनं पार पडलं अनिल कपूरच्या मुलीचं लग्न

दरम्यान काहीच वेळात ‘इंडियन आयडॉल 12’ चा विजेता समोर येणार आहे. संपूर्ण शो मध्ये पवणदीप आणि अरूनिता यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. तर लोकांनी त्यांची गाणी फारच एन्जॉय केली. याशिवाय पवनदीप राजन, अरुनिता कांजीलाल, शन्मुखप्रिया, सायली कांबळे, निहाल तारो आणि मोहम्मद दानिश हे स्पर्धक अंतिम फेरीत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
First published:

Tags: Entertainment, Indian idol, Tv shows

पुढील बातम्या