मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rhea Kapoor wedding: ना मेहंदी, ना संगीत! साध्या पद्धतीनं पार पडलं अनिल कपूरच्या मुलीचं लग्न

Rhea Kapoor wedding: ना मेहंदी, ना संगीत! साध्या पद्धतीनं पार पडलं अनिल कपूरच्या मुलीचं लग्न

शनिवारी उशीरा अनिल कपूर यांच्या मुंबईतील जुहू या ठिकाणी स्थित असलेल्या बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला.

शनिवारी उशीरा अनिल कपूर यांच्या मुंबईतील जुहू या ठिकाणी स्थित असलेल्या बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला.

शनिवारी उशीरा अनिल कपूर यांच्या मुंबईतील जुहू या ठिकाणी स्थित असलेल्या बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला.

  • Published by:  News Digital
मुंबई 15 ऑगस्ट : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या दुसऱ्या मुलीचं म्हणजेच रिया कपूरचं (Rhea Kapoor) लग्न पार पडलं आहे. 14 ऑगस्टला उशीरा हे लग्नं पार पडलं. रिया ही अभिनयक्षेत्रात नसली तरीही सिनेसृष्टीत सक्रिय आहे. ती एक चित्रपट निर्माती तसेच फॅशन ब्रँडची मालक आहे. करण बूलानी (Karan Boolani) या चित्रपट निर्मात्याशी तिने विवाह केला आहे. गेली 11 वर्षे ते एकमेकांना डेटट करत होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह होणार होता, मात्र काही कारणांनी तो पुढे ढकलण्यात येत होता. शनिवारी उशीरा अनिल कपूर यांच्या मुंबईतील जुहू या ठिकाणी स्थित असलेल्या बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा विवाह केल्याचं म्हटलं जात आहे.
लग्नात कोणताही मोठा तामझाम करण्यात आला नव्हता. तर मेहंदी, संगीत हे पांरपारिक कार्यक्रही आयोजीत करण्यात आले नव्हते. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने हा विवाहोसोहळा पार पडला. याशिवाय संपूर्ण कपूर कुटुंब आणि जवळचे नातेवाईकच या सोहळ्याला उपस्थित होते.
दरम्यान 2018 साली अनिल कपूर यांची मोठी मुलगी सोनम कपूरचा (Sonam Kapoor) विवाह झाला होता. आनंद अहूजा याच्याशी तिने विवाह केला होता. त्यावेळी अतिशय धुमधडाक्यात हे लग्न पार पडलं होतं. मागीलप्रमाणे याही वेळी अनिल यांनी सर्व मीडियाला मिठाईचे बॉक्सेस वाटले होते.
अर्जुन कपूर, बोनी कपूर, जान्हवी कपूर, मसाबा गुप्ता, अंशुला कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, संदीप मारवाह, संजय कपूर, माहीप कपूर आणि जहान कपूर संपूर्ण कपूर कुटुंबासह जवळच्या नातेवाईंकानी लग्नासाठी हजेली लावली होती.
First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Sonam Kapoor

पुढील बातम्या