‘तो कोणी छोटा राजन नव्हता…'; बेड न मिळाल्याने नातेवाईकाचा मृत्यू, इरफान खानच्या पत्नीचा राग अनावर

‘तो कोणी छोटा राजन नव्हता…'; बेड न मिळाल्याने नातेवाईकाचा मृत्यू, इरफान खानच्या पत्नीचा राग अनावर

सुतापा सिकदर (Sutapa Sikdar) यांच्या भावाचं निधन झालं. त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि वेळेवर बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असं सुतापा यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई 3 मे : कोरोनाची परिस्थिती (Corona pandemic) अद्याप नियंत्रणात आली नसून दिवसें दिवस रुग्णांचे आकडे हे वाढतानाचं दिसत आहेत. संपूर्ण देशभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. तर अनेकांचे उपचारादरम्यानचं मृत्यूही होत आहेत. नुकतच दिवंगत अभिनेता इरफान खानची (Irrfan Khan) पत्नी सुतापा सिकंदर (Sutapa Sikdar) यांच्या भावाचं निधन झालं. त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि वेळेवर बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असं सुतापा यांनी म्हटलं आहे. तर त्यांना याविषयी रोष व्यक्त केला आहे.

सुतापा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. फेसबूक वर एक पोस्ट लिहित सुतापा यांनी सरकारच्या ढसाळ कारभारावर टिप्पणी केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘मी एक दिवस आधीच माझ्या नातेवाईकाच्या समीर बॅनर्जीसाठी मदत मागीतली होती. आज तो आम्हाला सोडून गेला. आम्ही भारताच्या राजधानीत दिल्लीत राहतो पण या राजधानीत एका रुग्णांसाठी आयसीयू मिळवू शकलो नाही आणि आम्हाला कोणत्याही दवाखान्यात बेडदेखील मिळाला नाही.’

#notanobituary#don'tforget

I posted day before for help for my relative Sameer Banerjee.

Today he left us .We couldn’t...

Posted by Sutapa Sikdar on Sunday, 2 May 2021

पुढे सुतापा यांनी लिहिलं, ‘मी कोरोना योध्यांची आभारी आहे ज्यांनी मला खूप मदत केली. मी तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे, माझे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. मी समीर दादाचं हास्य कधीही विसरू शकत नाही. मी त्याच्या आठवणींना जपून ठेवेन. पण मी हे कधीही विसरणार नाही की, आम्हाला दवाखान्यात आयसीयू बेड मिळाला नाही कारण तो कोणीही छोटा राजन नव्हता. तो एक इमानदार व्यक्ती होता.’

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; 'फत्तेशिकस्त'मधील आणखी एका अभिनेत्याचं कोरोनाने निधन

‘दिल्लीत घडलेल्या या घटनेला मी कधीही विसरू शकत नाही. तुम्ही पण विसरू नका की, अशा अनेक बॅनर्जी, शेख, दास आणि अदजानिया सारख्या कित्येकांना मरायचं आहे. समीर आमच्या सोबत आणखी थोडा काळ राहू शकला असता जर आपण देशातील हिंदू आणि मुस्लिम सणांऐवजी देशातील दवाखाने, ऑक्सिजन प्लान्ट्सवर जास्त लक्ष दिलं असतं तर.’ सुतापा म्हणाल्या.

Published by: News Digital
First published: May 3, 2021, 11:52 PM IST

ताज्या बातम्या