मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; 'फत्तेशिकस्त'मधील आणखी एका अभिनेत्याचं कोरोनाने निधन

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; 'फत्तेशिकस्त'मधील आणखी एका अभिनेत्याचं कोरोनाने निधन

फर्जंद (Farzand) आणि फत्तेशिकस्त (Ftteshikasta) या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता नवनाथ गायकवाड (Navnath Gaikwad) याचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

  • Share this:

मुंबई 3 मे : देशभरात सध्या कोरोनाने थैमान (corona pandemic) घातलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेन् दिवस वाढतच आहे. याशिवाय अनेक रुग्णांचे उपचारादरम्यानचं मृत्यु होत आहेत. त्यामुळे देशभरातील परिस्थिती ही खालावत चालली आहे. अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागन झाली आहे. फर्जंद (Farzand) आणि फत्तेशिकस्त (Ftteshikasta) या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता नवनाथ गायकवाड (Navnath Gaikwad) याचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

नवनाथच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील एक चांगला कलाकार गेल्याची हळहळ व्यक्त होत आहे. नवानाथ याचा रूग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला. लेखक , दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली. या पोस्टमुळे मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेकांना धक्का बसला आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं आहे,  ‘फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..’  या पोस्ट नंतर अनेकांनी यावर कमेंट करुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर हळहळ ही व्यक्त केली आहे व  नवनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.

त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

🙏🙏

Posted by Digpal Lanjekar on Saturday, 1 May 2021

अभिनेता नवनाथ गायकवाड यांनी  ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मावळ्यांची भूमिका साकारली होती. नवनाथ यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फत्तेशिकस्त आणि फर्जंद चित्रपटाचे संकलन करणारे प्रमोद परिहार यांचाही कोरोनानेच मृत्यू झाला होता. त्यामुळे दोन कलाकारांचे मृत्यु झाल्याने सहकलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

महेश काळेने 5 वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर; चाहत्यांकडून केलं जातंय कौतुक

यापूर्वीही या कोरोनाच्या प्रकोपाने काही कलाकारंचा मृत्यु झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं. अमोल यांच्या निधनाची बातमी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.

राज्यातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता संपूर्ण चित्रपट आणि मालिकांचही चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. तर काही मालिका या आता राज्याबाहेर चित्रित होत आहेत.

Published by: News Digital
First published: May 3, 2021, 11:09 PM IST

ताज्या बातम्या