जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / इरफानच्या आठवणीनं बॉलिवूड झालं भावुक; ती फिल्म पाहून कलाकारांना कोसळलं रडू

इरफानच्या आठवणीनं बॉलिवूड झालं भावुक; ती फिल्म पाहून कलाकारांना कोसळलं रडू

इरफानच्या आठवणीनं बॉलिवूड झालं भावुक; ती फिल्म पाहून कलाकारांना कोसळलं रडू

इरफानचा मुलगा बाबिल (Babil Khan) यानं आपल्या वडिलांच्यावतीनं पुरस्कार स्विकारला. मात्र त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 9 एप्रिल**:** इरफान खान (Irrfan Khan) भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होता. त्यानं आपल्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये लाईफ ऑफ पाय, अंग्रेजी मिडियम, ज्युरॅसिक पार्क, स्लमडॉग मिलेनियर, लंच बॉक्स, स्पायडरमॅन (Life of Pi, English Medium, Jurassic Park, Slumdog Millionaire, Lunch Box, Spiderman) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज इरफानच्या मृत्यूला एक वर्ष लोटलं आहे. मात्र आजही त्याच्या आठवणीनं चाहत्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. अन् असाच काहीसा प्रसंग यंदाच्या फिल्म फेअर पुरस्कार (Filmfare Awards 2021) सोहळ्यात घडला. इरफानचा मुलगा बाबिल (Babil Khan) यानं आपल्या वडिलांच्यावतीनं पुरस्कार स्विकारला. मात्र त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. फिल्म फेअरनं एक विशेष पुरस्कार देऊन इरफान खानचा मरणोत्तर सन्मान केला. यावेळी त्याच्या जबरदस्त करिअरचा दाखला देणारी एक शॉर्ट फिल्म दाखवली गेली. यामध्ये त्याचे डायलॉग्स, त्याचे गाजलेले कोट्स, गाणी आणि चित्रपटांच्या क्लिप्स दाखवल्या गेल्या. ही शॉर्ट फिल्म पाहून सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वच कलाकारांचे डोळे पाणावले. त्यानंतर बाबिलनं पुरस्कार स्विकारुन वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - ‘त्यानं केवळ माझा वापर केला’; Anusha Dandekar एक्स बॉयफ्रेंडवर संतापली

जाहिरात

अवश्य पाहा - ‘द बिग बुल’ पाहण्यास जया बच्चन यांचा नकार; हे आहे चित्रपट न पाहण्याचं कारण इरफाननं स्वत:ला भारतीय रंचमंच, मालिका आणि चित्रपटांपूरतंच मर्यादित ठेवलं नाही. तर त्यापुढं थेड हॉलिवूडपर्यंत त्यानं मजल मारली. ‘द वॉरिअर्स’, ‘अ मायटी हार्ट’, ‘द दार्जिलींग लिमिटेड’, ‘न्यूयॉर्क आय लव्ह यू’ अशा चित्रपटांमधून लहानमोठ्या भूमिका साकारत त्यानं हॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं. खरं तर हे चित्रपट तिकीटबारीवर फार काही कमाल करु शकले नाही. मात्र यांमधून इरफान खान नावाचा एक अनोखा अभिनेता संपूर्ण जगासमोर आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात