‘द बिग बुल’ पाहण्यास जया बच्चन यांचा नकार; हे आहे चित्रपट न पाहण्याचं कारण

‘द बिग बुल’ पाहण्यास जया बच्चन यांचा नकार; हे आहे चित्रपट न पाहण्याचं कारण

ऐश्वर्या राय (Ashwariya Rai)आणि जया बच्चन (JayaBachchan)यांनी हा चित्रपट अद्यापही पाहिलेला नाही. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल असे का?,तर याचा खुलासा खुद्द अभिषेक बच्चनने केला आहे.

  • Share this:

मुंबई 8 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा नवा चित्रपट द बिग बुल (The Big Bull) हा नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित आहे. हा एक क्राईम ड्रामा चित्रपट आहे. अजय देवगन (Ajay Devgan) आणि आनंद पंडीत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर कुकी गुलाटीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याचे रिव्ह्यू आता येऊ लागले आहेत. रिलीज होण्यापूर्वी आपल्या मुलाचा हा बहुचर्चित चित्रपट ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पाहिला. त्यांना हा चित्रपट आवडला आहे. परंतु ऐश्वर्या राय (Aishwariya Rai) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी हा चित्रपट अद्यापही पाहिलेला नाही. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल असे का?,तर याचा खुलासा खुद्द अभिषेक बच्चनने केला आहे.

अभिषेक बच्चन गेल्या काही कालावधीपासून द बिग बुल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिषेकसह इलियाना डिक्रुज प्रमुख भूमिकेत आहे. बॉलिवूड बबलशी बोलताना ज्युनिअर बच्चन म्हणाला,की रिलीज होण्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट पाहिला आहे. त्यांना चित्रपट आणि माझी भूमिका विशेष आवडली. माझ्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांनी काही चांगल्या गोष्टीही मला सांगितल्या. माझ्या वडिलांचा रिव्ह्यू (Review) नेहमीच माझ्यासाठी खूप खास असतो.

अवश्य पाहा - Ratris Khel Chale… शेवंता आली आता वच्छीची सून शोभा कधी येणार?

यावेळी अभिषेक बच्चन याने माझी आई जया बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हिने हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचे सांगितले. माझी आई थोडी अंधश्रध्दाळू आहे. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ती तो पाहत नाही. हा चित्रपट तिच्या वाढदिवसाआधी एक दिवस रिलीज झाला आहे. त्यामुळे वाढदिवसाची भेट म्हणून ती हा चित्रपट पाहणार आहे. ती हा चित्रपट नक्की पाहिल आणि मला अत्यंत नेमकेपणाने रिव्ह्यू आणि प्रतिक्रिया देईल. तिला चित्रपट पाहताना जे जाणवेल तेच ती स्पष्टपणे सांगेल,असे अभिषेक बच्चन याने सांगितले. ऐश्वर्याने देखील चित्रपट रिलीज झाल्यावरच तो पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण प्रत्येक वेळी ती चित्रपट रिलीज झाल्यावरच चित्रपटाचा आनंद घेते,असेही अभिषेक याने नमूद केले आहे.

First published: April 9, 2021, 3:35 PM IST

ताज्या बातम्या