आर्यन अगदी वडील शाहरुख खानसारखा दिसतो, असं नेहमी बोललं जातं. जेव्हा कधी त्याच्या वडिलांसोबत दिसला, त्याला किंग खानच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं. 2016 मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं हे चित्र समोर आलं होतं ज्यात शाहरुख खान, गौरी खान आणि मोठा मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान आणि लहान मुलगा अब्राहम खान दिसत आहेत.
शाहरुख खान आणि आर्यन खान बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट पिता-पुत्र जोडींपैकी एक आहेत. या फोटोमध्ये शाहरुख आपल्या मुलासोबत दिसत आहे. स्पोर्टस डे इव्हेंट दरम्यान चित्र त्याच्या शालेय काळातील असल्याचं दिसत आहे.
आर्यनने काही दिवसांपूर्वी त्याची आई गौरी खान सोबत एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला होता, आणि कॅप्शन दिले होते 'द बर्थ गिव्हर'.
सप्टेंबर 2021 मध्ये गौरी खानने आर्यन आणि अब्राहम या दोन्ही मुलांबरोबर एक सुंदर फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करताना गौरीने लिहिलं होतं की, 'बॉईज नाईट आऊट.'
यावर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आयपीएल लिलावादरम्यान आर्यन त्या ठिकाणी उपस्थित होता. तेव्हा नेटिझन्सनी त्याच्या कॉफी पिण्याच्या शैलीचं वर्णन शाहरुख खानसोबत केलं होतं.
शाहरूख आणि त्याचा मुलगा आर्यनच्या या सेल्फीतही दोघं अगदी सारखेच दिसत आहेत. या फोटोवरही सोशल मिडियावर कमेंट्सचा पाऊस पडला होता.
आर्यन शाहरुख खानला क्रूझ पार्टीवर झालेल्या कारवाईत अटक झाली. ड्रग्ज प्रकरणी त्याला तीन दिवस कस्टडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.