Home /News /entertainment /

‘मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच’ अभिनेता इरफान खान झाला भावुक

‘मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच’ अभिनेता इरफान खान झाला भावुक

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखती आजारपण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना इरफान खान खूपच भावुक झालेला दिसला.

    मुंबई, 04 मार्च : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता इरफान खान मागच्या जवळपास 2 वर्षांपासून ‘हाय ग्रेड न्युरोएंडोक्राइन’शी झुंज देत आहे. न्यूयॉर्कमध्ये बराच काळ यावर उपचार घेतल्यानंतर इरफान 2019 मध्ये पुन्हा भारतात परतला होता. त्यानं त्याचा बहुचर्चित सिनेमा अंग्रेजी मीडियमचं शूटिंग पूर्ण केलं. हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इरफान उपस्थित राहू शकणार नाही. कारण उर्वरित उपचारांसाठी तो पुन्हा न्यूयॉर्कला रवाना झाला आहे. मात्र सिनेमाच्या रिलीज अगोदर दिलेल्या एक मुलाखती आजारपण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना तो खूपच भावुक झालेला दिसला. इरफान खाननं मुंबई मिररला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी बोलताना इरफान म्हणाला, हा संपूर्ण काळ माझ्यासाठी रोलर-कोस्टरसारखा आहे. ज्यात आपण थोडं हसू थोडं रडू. दरम्यानच्या काळात मी प्रचंड अस्वस्थ होतो. पण मी त्याला कंट्रोल केलं. असं वाटत होतं की मी सतत माझ्यासोबतच हॉपस्कॉच खेळत आहे. ‘मी त्याचे पाय तोडले; आता चालणंही कठीण झालं आहे’, सैफशी भांडणाबाबत अजयचा खुलासा इरफान पुढे म्हणाला, 'या काळात मी स्वतःसाठी आणि स्वतःच्या माणसांसाठी जगलो. यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला माझ्या मुलांसोबत बराच वेळ देता आला.' पत्नी सुतापा सिकदर बद्दल बोलताना तो म्हणाला, 'तिच्या बद्दल मी काय बोलू. ती माझ्यासाठी 7 दिवस 24 तास खंबीरपणे उभी राहिली. माझी देखभाल केली. या आजारपणात तिची मला खूप मदत झाली. मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच जर मला पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळाली तर मला तिच्यासाठी जगायचं आहे.' अंग्रेजी मीडियम या सिनेमात इरफान खान पुन्हा एकदा दीपक डोबरियालसोबत दिसणार आहे. दीपक आणि इरफानच्या जोडीला हिंदी मीडियम या सिनेमाच्यावेळी खूप प्रेम मिळालं होतं. सध्या इरफान या आजारपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहणं त्याला शक्य नाही. …आणि क्षणार्धात ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे सनी लिओनी सुद्धा झाली अदृश्य, पाहा VIDEO ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफान खानसोबत करिना कपूर, राधिका मदन, पंकड त्रिपाठी, किकू शारदा, रणवीर शोरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 2018 इरफान खानला 'हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर'चं निदान झालं होतं. मागच्या वर्षी प्रकृतीत सुधारणा झाल्यानं इरफाननं अंग्रेजी मीडियम सिनेमाचं शूट सुरू केलं मात्र या सिनेमाचं शूट संपल्यावर त्याला पुन्हा एकदा उपचारासाठी न्यूयॉर्कला परतावं लागलं. मुंबईची राजभाषा मराठीच! मनसेच्या दणक्यानंतर हिंदी मालिकेचे निर्माते नरमले
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Irrfan Khan

    पुढील बातम्या