जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'इरफानचा भास होतोय...' Irrfan Khanच्या मुलाचे Photo पाहून अभिनेत्याच्या आठवणीत चाहते भावुक

'इरफानचा भास होतोय...' Irrfan Khanच्या मुलाचे Photo पाहून अभिनेत्याच्या आठवणीत चाहते भावुक

'इरफानचा भास होतोय...' Irrfan Khanच्या मुलाचे Photo पाहून अभिनेत्याच्या आठवणीत चाहते भावुक

दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याचा मुलगा बाबिल याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना नक्कीच त्यांच्या ‘मकबूल’ची आठवण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च: बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पण त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तो त्याच्या चित्रपटांमधून जिवंत आहे. इरफान खान याच्या पश्चात त्याची पत्नी सुतापा आणि दोन मुलं बाबिल आणि अयान आहेत. बाबिल (Irrfan Khan Son Babil) देखील मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये त्याचा जम बसवत आहे. बाबिल खान लवकरच Qala या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अन्विता दत्त करणार असून याची निर्मिती अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांची आहे. बाबिल त्याच्या वडिलांच्या जाण्यानंतर नेहमी त्यांच्याबद्दल बोलताना दिसला. सोशल मीडियावर त्याने इरफानचे काही जुने फोटोज देखील शेअर केले आहेत. पण अलीकडेच त्याने शेअर केलेले फोटो खास (Babil Khan Instagram) आहेत. यावेळी बाबिलने स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत आणि अनेकांनी यावर कमेंट केली आहे की हे फोटो पाहून इरफानचा भास झाला.

जाहिरात

बाबिलने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी, चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यापैकी अनेकांचे म्हणणे असे आहे की या फोटोंमध्ये त्यांना इरफान खानचा भास झाला. खरंच काही क्षणांसाठी हे फोटो इरफानचे आहेत की काय असं वाटून जातं. एका युजरने म्हटलं आहे की, ‘मला तुझ्यात इरफान साहब दिसले’, तर एकाने म्हटले आहे की, ‘प्रत्येक दिवसागणिक तू आमच्या प्रिय इरफान भाईसारखा दिसू लागला आहेस बाबिल’. ‘तू माझ्या फेव्हरिट व्यक्तीसारखा दिसतो आहेत, ते कुठेही गेले नाहीत’, अशी भावुक कमेंटही एका युजरने केली आहे. तर एकाने बाबिलच्या या फोटोंना ‘तरुण इरफान सर’ असे म्हटले आहे. हे वाचा- अपघातानंतर कशी आहे मलायकाची परिस्थिती? बहिणीने दिली महत्त्वाची माहिती बाबिलच्या बॉलिवूड पदार्पणाची आता त्याच्या चाहत्यांसह इरफानच्या चाहत्यांनाही प्रतीक्षा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने गेल्या वर्षी लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यापूर्वी, त्याने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जाहीर केले होते की अभिनयासाठी त्याने पुढे अभ्यास सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात