मुंबई, 29 एप्रिल : 53 वर्षाच्या आयुष्यात बॉलिवूडवर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा हरहुन्नरी कलाकार इरफान खानचं आज निधन झालं आहे. कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मंगळवारी Colon Infection मुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. इरफानच्या जाण्याने हा बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. इरफानच्या जाण्याने अनेकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी इरफान खानच्या मृत्यूबाबत भावनिक ट्वीट केलं आहे. अमिताभ आणि इरफान ही जोडी पिकू या सिनेमात एकत्र दिसली होती.
T 3516 - .. just getting news of the passing of Irfaan Khan .. this is a most disturbing and sad news .. 🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 29, 2020
An incredible talent .. a gracious colleague .. a prolific contributor to the World of Cinema .. left us too soon .. creating a huge vacuum ..
Prayers and duas 🙏
इरफानचे जवळचे मित्र फिल्ममेकर सुजित सरकार यांनी देखील इरफानच्या जिद्दीचं कौतुक करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे
इरफानच्या जाण्याने चित्रपटसृष्टीच नाही तर अनेकांना दु:ख झाले आहे. त्याच्या कमालीच्या अभिनयामुळे नेहमीच तो सर्वांच्या स्मरणात राहील.
अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 29, 2020
इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 29, 2020
काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला जयपूरमध्ये पोहोचणं शक्य झालं नाही. त्यानंतरच इरफानची तब्येत बिघडण्यास सुरूवात झाली होती. मुंबईत असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच इरफानने आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं.

)







