मुंबई, 26 मार्च- प्रिया बापट (priya bapat) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पती उमेशसोबत प्रिया भन्नाय रील्स असतील किंवा रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाबद्दल देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असते. प्रियाने नुकताच तिचा एक स्टनिंग फोटो (priya bapat latest photo) शेअर केला आहे. या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
प्रियान बापटनं आंखों की गुस्ताखियां माफ़ हो असं म्हणत तिचा एक स्टनिंग फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोंमध्य ती ब्रालेटमध्ये दिसत आहे. शिवाय हात वरती करत तिनं या फोटोंमध्ये स्टनिंग अशी पोझ दिली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. कुणी हॉटी तर कुणी हॉट म्हणत तिच्या फोटोचे कौतुक केले आहे. मात्र या सगळ्यात एक कमेंट मात्र लक्षवेधी ठरत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, 'फोटोग्राफरने कहा हात उपर करके खडे हो जाओ....'..त्य़ाची ही अफलातून कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
वाचा-गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसला 'BB' फेम अभिनेता, कपलचा video viral
प्रिया बापटबद्दल थोडसं...
प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने 'चारचाँद' लावले. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.
View this post on Instagram
प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरी
प्रिया आणि उमेश यांना क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. याची आठवण करत प्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "उमेशने लग्नासाठी फार वेळल घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते." अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली दोघांनी लग्न केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.