मुंबई, 21 ऑगस्ट : नेहमी वादात अडकणारा युट्यूबर आणि बिग बॉस 13 चा स्पर्धक हिंदूस्तानी भाऊला (Hindustani Bhau) इन्स्टाग्रामने मोठा झटका दिला आहे. इन्स्टाग्रामने (Instagram) त्याचे अकाउंट निलंबित केले आहे. अनेक युजर्सनी त्याचे अकाउंट द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारास प्रसिद्धी देणारे (promoting hate speech and violence) असaल्याचा रिपोर्ट केला होता. अखेर इन्स्टाग्रामने त्यांच्या गाइडलाइन विरोधात हिंदूस्तानी भाऊच्या पोस्ट असल्याने त्याचे अकाउंट निलंबित केले आहे. नुकतेच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्याने हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांवर अर्वाच्य शब्दात टीका केली होती. देवाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा हातात घेण्याची आणि कुणालाही न सोडण्याची भाषा त्याने या व्हिडीओमध्ये केली होती. (हे वाचा- PM नरेंद्र मोदींच्या पावलावर अक्षय कुमारचे पाऊल, पोस्ट शेअर करून दिली माहिती ) 18 ऑगस्ट रोजी कॉमेडियन कुणाल काम्रा (Kunal Kamra) याने हिंदूस्तानी भाऊचा एक व्हिडीओ शेअर करत गृहमंत्री अनिल देशमुख (HM Anil Deshmukh) आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केले होती. भाऊ द्वेष पसवरत असल्याचा आणि जमावाला उत्तेजन देत असल्याचा आरोप त्याने केला होता.
HM @AnilDeshmukhNCP & @MumbaiPolice,
— Kunal Kamra (@kunalkamra88) August 18, 2020
Calling for open violence is a crime. This is a mob building & hate spreading excercise. This is deeply alarming. Could lead to violence & an artist not getting due process.
Remarks like “System side main”
are an insult to our constitution... pic.twitter.com/oeCfdGFRu5
दरम्यान आता हिंदूस्तानी भाऊचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड केल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता शशांक अरोरा याने देखील अशीच पोस्ट केली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर याबाबत मीम्स आणि जोक्स देखील शेअर केले जात आहेत.
हिंदूस्तानी भाऊ त्याच्या अर्वाच्य आणि शिवीगाळ करणाऱ्या भाषेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे मुळ नाव विकास फाटक असून सलमान खानच्या बिग बॉस 13 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. तेव्हा त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली होती. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप करत त्याने एकता कपूर हिच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली होती.