टाळेबंदीतील शिथिलतेनंतर सर्वसामान्यांसाठी भारतीय रेल्वेनं (Indian Railways) विविध गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र गाडय़ांमध्ये अतिरिक्त तिकीट दर लावला जातो. शिवाय या गाडय़ांना सर्वसामान्य डबेही नसतात. या सर्वांचा भुर्दंड प्रवाशांना बसतो आहे. (Railways hikes fare) तसंच या गाडय़ांमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. या प्रकारावरुन अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) हिने संताप व्यक्त केला आहे. याला म्हणतात खरा मास्टरस्ट्रोक असा टोला तिनं मोदी सरकारला लगावला आहे. “रेल्वेमध्ये अन्नाचे भाव वाढवले जात आहेत. कारण अतिरिक्त अन्न ग्रहण करुन प्रवासी लठ्ठ होऊ नयेत.” याला म्हणतात मास्टरस्ट्रोक अशा आशयाचं ट्विट करुन रिचानं मोदी सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा - रन मल्ला रन…. मलायकाचे बोल्ड फोटो पाहून कतरिनाही झाली अवाक रेल्वेने सध्या नियमित गाडय़ांनाच विशेष दर्जा दिला असून, कोणतीही गाडी नियमित म्हणून दाखविण्यात येत नाही. त्यामुळे विशेष गाडय़ांसाठी आकारण्यात येणाऱ्या जादा शुल्कासह प्रवाशांना तिकीट दर द्यावा लागतो आहे. दिवाळीत सुरू केलेल्या फेस्टिव्हल स्पेशल गाडय़ाही तीन महिन्यांनंतर कायम ठेवून प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्काची वसुली केली जात आहे. त्याचप्रमाणे या गाडय़ांमध्ये सर्वसामान्य श्रेणीचे डबे नसल्याने सर्वानाच वरच्या श्रेणीतील तिकीट दरातच प्रवास करावा लागत आहे.