Home /News /entertainment /

आता येणार 'Indian Idol मराठी'; प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

आता येणार 'Indian Idol मराठी'; प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

इंडियन आयडॉल हिंदीने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच उंची गाठली आहे. दरम्यान आता मराठीत हा शो सुरू होणार आहे.

  मुंबई  8 सप्टेंबर :  छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol)  हा सीझन नुकताच संपला आहे. सोनी टीव्हीवरील (Sony Tv) हा प्रचंड लोकप्रिय हिंदी शो आहे. पण आता मराठी प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी खास ‘इंडियन आयडॉल मराठी’ (Indian Idol Marathi) आणण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी तसेच श्रोत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. हा शो आता मराठीत येत असल्याने अनेक मराठी गायकांसाठी देखील ही संधी ठरणार आहे. सोनी मराठी (Sony Marathi) चॅनल वर हा कार्यक्रम दिसणार आहे. नुकताच चॅनलने या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केला असून, लवकरच शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  इंडियन आयडॉल हिंदीने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच उंची गाठली आहे. अनेक वर्षे हा शो सुरू आहे. अनेक प्रसिद्ध गायक या शो मधून जगासमोर आले आहेत. त्यातील ताजी उदाहरणे म्हणजे प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar), जी आता या शोची जज सुद्धा आहे. यानंतर जुबिन नौटियाल (Jubin Nautial), अभिजित सावंत (Abhijeet Sawant) असे अनेक गायक या शो मधून पुढे गेले आहेत.

  Aruna Bhatia Death: निर्मात्या होत्या अरुणा भाटिया; अक्षयच्या या सिनेमांची केली होती निर्मीती

  दरम्यान मराठीत हा शो सुरू होणार आहे. पण अद्याप यात कोण परीक्षक असणार तसेच शो कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रोमो नंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे. अनेकांनी शो च स्वागत केलं आहे. याआधी मराठीत ‘सा रे ग म प’ (Sa Re Ga Ma Pa), ‘सुर नवा ध्यास नवा’, ‘युवा सिंगर’ असे शो झाले आहेत. तर आता ‘मराठी इंडियन आयडॉल’ हा नवा शो येत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Indian idol, Marathi entertainment

  पुढील बातम्या