Home /News /entertainment /

Aruna Bhatia Death: निर्मात्या होत्या अरुणा भाटिया; अक्षयच्या या सिनेमांची केली होती निर्मीती

Aruna Bhatia Death: निर्मात्या होत्या अरुणा भाटिया; अक्षयच्या या सिनेमांची केली होती निर्मीती

अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia) यांच मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं.

    मुंबई 8 सप्टेंबर : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आईचं आज सकाळी  निधन झालं. अरुणा भाटिया (Aruna Bhatia) या मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करणायत आलं होतं. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हॅन्डलवरून स्वतः ही माहिती दिली. दरम्यान 3 सप्टेंबर रोजी अरुणा यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या आयसीयूमध्ये मध्ये होत्या. तर दुसरीकडे अक्षय युकेमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटींग करत होता. पण आईची प्रकृती खालावल्यानंतर त्याने शुटींग अर्धवट सोडलं होतं. व आईला भेटण्यासाठी भारतात परतला होता. 8 सप्टेंबरला सकाळी त्यांचं निधन झालं. अरुणा भाटिया या चित्रपट निर्मात्या देखील होत्या. पंजाबमध्ये जन्म झालेल्या अरुणा मुलगा अक्षय कुमार बॉलिवूड अभिनेता झाल्यानंतर निर्मिती क्षेत्रात आल्या होत्या. हरी ओम प्रॉड्क्शन्सच्या (Hari Om productions) त्या भागीदार होत्या. तर त्याचं कामकाजही पाहायच्या. आजवर त्यांनी सिंग इज किंग, पटियाला हाऊस, ओएमजी (OMG) , हॉलिडे, एअरलिफ्ट, रुस्तम, टॉयलेट - एक प्रेमकथा, मिशन मंगळ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कंगना रणौतचा मोठा निर्णय; अभिनेत्रीनं बदललं आपलं नाव ‘राम सेतू’ (Ram Setu) हा देखील त्यांचा आगामी प्रोजेक्ट होता. हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचे वडील हरी ओम भाटीया हे आर्मीत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचंही निधन झालं होतं. दरम्यान अक्षय सध्या त्याचा आगामी चित्रपट सिंड्रेलासाठी शुटींग करत होता. पण आईची प्रकृती खालावल्याने भारतात आला होता. याशिवाय नुकताच त्याचा बेल बॉटम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या