मुंबई, 23 ऑक्टोबर : सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा **’**इंडियन आयडॉल 13’ हा कार्यक्रम सध्या खूप लोकप्रिय ठरत आहे. स्पर्धक आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या कार्यक्रमातील दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये भरपूर धमाल प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. दिवाळी स्पेशल भागात कोण स्पेशल गेस्ट हजेरी लावणार आहे याचा एक व्हिडीओही समोर आलाय. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुपरस्टार गोविंदा संपूर्ण कुटुंबासह इंडिया आयडॉल 13 च्या मंचावर उपस्थित राहणार आहे. या शोमध्ये गोविंदा पत्नी सुनीता आणि मुलगी टीना आहुजासोबत येणार आहे. सोनी एंटरटेनमेंट चॅनलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, गोविंदाने आपली मुलगी आणि पत्नीसह इंडियन आयडॉलच्या मंचावर शानदार एन्ट्री घेतली. गोविंदाची सुपरहिट गाणी गाऊन स्पर्धकांनी त्याला चकित केलं. गोविंदाची पत्नी सुनीता अभिनेत्याकडे तक्रार करत म्हणते की गोविंदाने आजपर्यंत माझ्यासोबत डान्स केला नाही. आपल्या पत्नीची ही इच्छाही गोविंदाने इंडियन आयडॉलच्या मंचावर पूर्ण केलेली पहायला मिळाली. गोविंदाने सुनितासोबत धमाकेदार डान्स केला. गोविंदा म्हणाला- मी बरीच वर्षे वाट पाहिली. यानंतर गोविंदा आपल्या पत्नीला प्रेमाने मिठी मारतो आणि नंतर तिला किस करतो. हे पाहून त्याची मुलही टीना लाजताना दाखवली आहे. हेही वाचा - Diwali 2022: दिवाळी पार्ट्यांमधून दीपिका-रणवीर गायब; पुन्हा विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण आागमी भागात गोविंदा नेहचं कौतुक करताना दिसणार आहे. याचा एक व्हिडीओही सोनी एंटरटेनमेंट चॅनलच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. गोविंदाच्या तोंडून तिचे कौतुक ऐकून नेहा कक्कर खूप भावूक होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्यानंतर नेहाला रडताना पाहून गोविंद तिचे अश्रू पुसताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळी स्पेशल भागात धमाल, मस्तीसोबत थोडे इमोशन्सही पहायला मिळणार आहे.
दरम्यान, शोबद्दल बोलायचे झाले तर नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया इंडियन आयडॉल 13 चे जज आहेत. त्याचबरोबर आदित्य नारायण हा शोचा होस्ट आहे. इंडियन आयडॉल हा टीव्हीवरील हिट रिअॅलिटी शोपैकी एक आहे.