मुंबई 17 ऑगस्ट : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो इंडियन आयडॉलचा (Indian Idol 12) नुकताच ग्रँड फिनाले (Grand finale) पार पडला. तर स्पर्धेतील प्रसिद्ध गायक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) हा विजेता ठरला. त्याच्यावर सगळीकडून सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकूण सहा स्पर्धक टॉप मध्ये पोहोचले होते. तर पवनदीप, अरूनीता, सायली हे टॉप थ्री मध्ये पोहोचले होते. पवनदीप आणि अरुणीता (Arunita Kanjilal) यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली होती. पवनदीप आणि अरुणीता यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती ‘आज जाने की जिद ना करो’ (Aaj Jane ki zid na karo) हे लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहे. तर पवनदीप गिटार वाजवत आहे. अरुणीता सुंदर तिच्या सुरांची साथ देत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या फारच व्हायरल होतोय.
दरम्यान शो सुरू असताना पवनदीप आणि अरूनिता यांची विशेष चर्चा रंगली होती. तर ते दोघेही एकमेकांना पसंत करत असल्याचं म्हटलं जातं होत. मात्र त्यानंतर त्यांनी यावर खुलासा केला होता. HBD Spl: एकाच दिवशी वाढदिवस असणाऱ्या ‘पिळगावकर कपल’विषयी घ्या जाणून; दत्तक मुलीने केले होते गंभीर आरोप अरूनिता आणि आपण केवळ चांगले मित्र आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच एकमेकांसोबत गायला ही आवडत असही पवनदीप म्हणाला होता. त्यामुळे आपण केवळ मित्रच असल्याचं त्याने सांगितल. तर आता पवनदीप शोचा विजेता झाला आहे. त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी अरुणीताने तिच्या यूट्यूब चॅनल वर पोस्ट केलेलं त्यांचं गाणं आता व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांना हे गाणं फारच आवडल असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.