नुकताच सायलीने स्वतः सोशल मीडियावर आपल्या लव्हलाईफबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. तर हे ऐकून निहाल आणि सायलीच्या जोडीबद्दल खुश असणाऱ्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सायलीने फक्त आपल्या बॉयफ्रेंडबद्दलच सांगितलं नाही, तर तिने त्याचा फोटो शेअर करत त्याच नावही सांगितलं आहे आणि सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. तुम्हालाही सायलीच्या लव्ह पार्टनरबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. (हे वाचा:'अशी ही बनवाबनवी'ची ३३ वर्षे पूर्ण; स्वप्नील जोशीने लिहिली खास पोस्ट) सायली कांबळेने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपला आणि आपल्या बॉयफ्रेंडचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर यासाठी तिने खूपच खास कॅप्शन लिहिलं आहे . या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फोटो कॅप्शन देत सायलीने म्हटलं आहे, 'चलो जी आज साफ साफ कहती हूँ, इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है' आणि समोर धवल असं नाव लिहिलं आहे. अशा अगदी फिल्मी अंदाजात सायलीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. चाहते हे पाहून फारच खुश आहेत. सर्वजण सायलीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर काहीं चाहत्यांनी आपलं मन तुटल्याचंही म्हटलं आहे. (हे वाचा:Bigg Boss15: 'थीम आणि ट्विस्टपासून स्पर्धकांपर्यंत' जाणून घ्या बिग बॉस 15 च्या..) तसेच सायलीच्या या पोस्टवर तिचे इंडियन आयडॉल स्पर्धक मोहम्मद दानिश, अंजली गायकवाड, निहाल टोरो सर्वजण सायलीवर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत. इंडियन आयडॉलमध्ये सायलीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तसेच या शोमध्ये सायलीसोबत निहाल टोरोच नावदेखील जोडलं जात होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Indian idol