Home /News /entertainment /

हास्याने लोटपोट करणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी'ची ३३ वर्षे पूर्ण; स्वप्नील जोशीने लिहिली खास पोस्ट

हास्याने लोटपोट करणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी'ची ३३ वर्षे पूर्ण; स्वप्नील जोशीने लिहिली खास पोस्ट

२३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा मनोरंजनाचा सोनेरी अनुभव देणारा चित्रपट आपल्या भेटीला आला होता. अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

  मुंबई,23 सप्टेंबर- 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banvabanavi) या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखलं जातं. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने आणि विनोदाने या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. आज या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल ३३ वर्षे (33 Years Complete) पूर्ण झाली. आज २३ सप्टेंबर १९८८ मध्ये रिलीज होत या चित्रपटाने इतिहास घडवला आहे. आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. २३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा मनोरंजनाचा सोनेरी अनुभव देणारा चित्रपट आपल्या भेटीला आला होता. अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट मराठीचित्रपटसृष्टीतील एक अद्भुत निर्मिती समजला जातो. कारण आजही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. आज ३३ वर्षांनंतरही प्रत्येक पिढी हा चित्रपट तितक्याच आवडीने बघते. आणि लोटपोट होऊन हसते. फारच कमी चित्रपट असे असतात ज्यांना प्रेक्षकांचं इतकं अफाट प्रेम भेटतं. अभिनेता अशोक सराफ, लाक्षिमीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुशांत रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा अशी भली मोठी आणि तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली होती. या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय करत चित्रपटाचं सोनं केलं आहे. (हे वाचा:सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष) या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'मी. माने, सत्तर रुपये वारले, नवऱ्याने टाकलीय असे अनेक डायलॉग चाहत्यांना आजही आठवतात आणि त्यांना पोटधरून हसायला भाग पडतात. हे डायलॉग प्रत्येकाच्या मनात अगदी घर करून बसले आहेत. तसेच हृदयी वसंत, कुणी तरी येणार, अशी ही बनवाबनवी' ही गाणी आजही प्रेक्षकांना थिरकायला भाग पडतात. या चित्रपटाची मूळ कथा ऋषिकेश मुखर्जी यांच्या हिंदी 'बीवी और मकान'मधून घेतली आहे. मात्र मराठीतील तयार झालेल्या 'अशी हि बनावबनवी'ने इतिहास रचला आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi: मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरून तुफान राडा; तर दुसरीकडे सोनाली) सध्या चित्रपटाने ५० कोटींच्या वर कमाई केली, तर तो चित्रपट हिट समजला जातो. तसेच १०० कोटी म्हणजे सुपरहिट. मात्र या चित्रपटाने त्या काळात फर्स्टला ३ रुपये आणि बाल्कनीला फक्त ५ रुपये तिकीटने तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. ज्याचा आजच्या किमतीने हिशोब काढल्यास कमाईचा आकडा १०० कोटींच्या घरात जातो. सर्वसामान्य लोकच नव्हे तर प्रत्येक कलाकाराला या चित्रपटाची भुरळ आहे. त्यामुळेच अभिनेता स्वप्नील जोशीने आज चित्रपटाने ३३ वर्षे पूर्ण केल्याच्या आनंदात एक खास पोस्ट केली आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi:नॉमिनेशन टास्कनंतर घरात रंगणार चिऊताईचा खेळ; पाहा कोण मारणार..) स्वप्नील जोशी पोस्ट-
  अशी ही बनवाबनवी* !माझ्यासाठी, सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक ! आज release होऊन 33 वर्ष झाली ना!!? वाटतच नाही ! कधीही पहा, कुठूनही पहा, कितीही वेळा पहा, निखळ मनोरंजन, केवळ अद्भुत कलाकृती !!! Btw, तेव्हा पासून धनंजय माने सदैव इथेच (आमच्या हृदयात) राहतात !! सचिनजी, अशोकमामा, लक्ष्यामामा, सुप्रियाताई, निवेदिताताई, प्रियाताई, अश्विनीजी, अरुणजी, वसंतजी, किरण शांतारामजी, सुशांतजी, सुधीरकाका व संपूर्ण टीमला सलाम'. असं लिहीत स्वप्नीलने या चित्रपटावरच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या