शाहरुख खानची मुलगी सुहाना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत असते. सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेलं नाही. मात्र ती एखाद्या अभिनेत्री इतकीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असणाऱ्या, सुहानाला एका चाहत्याने चक्क ट्वीटरवर लग्नासाठी मागणी घातली आहे. सुहानाची आई गौरी खानने सुहानाचा फोटो शेयर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. गौरीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत, सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र एका कमेंटने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्या युजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'गौरी मॅम तुम्ही सुहानाचं लग्नं माझ्यासोबत करून द्या. मी महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावतो', सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण घेत आहे. सुहानाने आपल्या मित्रांसोबत न्यूयॉर्कमध्ये आपला वाढदिवस साजरा केला आहे. सुहाना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. सुहानेचे सोशल मीडियावर मोठे फॉलोअर्स देखील आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरून कमेंट आणि लाईक्स देत असतात.