मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांची ओळख आहे. आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांतून त्यांनी आपली अभिनयाची जादू दाखवली आहे.
श्रीमंताघरची सूनमध्ये ऐश्वर्या या सासूची म्हणजेच अरुणा ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांचं हे पात्र प्रेक्षकांना चांगलच पसंत पडत आहे.
ऐश्वर्या सोशल मीडियावरही चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. नुकतेच त्यांनी आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात कोणत्याही आभूषणांशिवाय ऐश्वर्या यांच सौंदर्य खुलून दिसत आहे.
याआधी त्यांनी आपल्या खण साडीतीलही असे बरेच सिम्पल लूकमध्ये फोटो शेअर केले होते. ज्यात त्या अतिशय मनमोहक दिसत आहेत.