मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss! VIDEO पाहून भडकले यूजर्स

Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss! VIDEO पाहून भडकले यूजर्स

बिग बॉस १५ च्या घरामधील स्पर्धक मायशा अय्यर (Miesha Iyer) आणि ईशान सेहगल (Ishan Sehgal) एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत.

बिग बॉस १५ च्या घरामधील स्पर्धक मायशा अय्यर (Miesha Iyer) आणि ईशान सेहगल (Ishan Sehgal) एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत.

बिग बॉस १५ च्या घरामधील स्पर्धक मायशा अय्यर (Miesha Iyer) आणि ईशान सेहगल (Ishan Sehgal) एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत.

  मुंबई,  9ऑक्टोबर- बिग बॉसच्या घरात वादविवाद, प्रेम, नाराजी सर्वकाही एकत्र पाहायला मिळत आहे. बिग बॉस १५(Bigg Boss 15) चा पहिलाच आठवडा आहे. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये जवळीकता वाढताना दिसून येत आहे. बिग बॉस १५ च्या घरामधील स्पर्धक मायशा अय्यर (Miesha Iyer) आणि ईशान सेहगल (Ishan Sehgal) एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर या दोघांचा BB हाऊसमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दोघे एकमेकांना किस करताना दिसून येत आहेत. मात्र युजर्सना या दोघांची ही वर्तवणूक पसंत पडलेली नाहीय. युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत.
  बिग बॉस हा प्रचंड लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो आहे. हा शो नेहमीच आपल्या स्पर्धकांमुळे, टास्कमुळे आणि स्पर्धकांच्या पर्सनल लाईफमुळे  चर्चेत असतो. १९ ऑक्टोबरपासून 'बिग बॉस'च्या १५ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शोच्या पहिल्या दिवसापासून वादविवाद, प्रेम, राडे पाहायला मिळत आहेत. या सीजनमधील स्पर्धक मायशा अय्यर आणि ईशान सेहगल एकमेकांच्या जास्त जवळ येत असल्याचं दिसत आहेत. (हे वाचा:Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात जय आणि प्रतीकमध्ये तुफान राडा ... ) नुकताच या दोघांना बिग बॉस जंगलमध्ये एक ब्लॅंकेट एकमेकांशी शेअर करताना पाहण्यात आलं होत. मात्र या दोघांमध्ये आत्ता जास्तच जवळीकता दिसून येत आहे. नुकताच बिग बॉसच्या फॅन पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये हे दोघे एकेमकांना किस केल्याचं म्हटलं जात आहे. दोघांचा चेहरा केसांमुळे झाकला जातो. त्यामुळे स्पष्ट समजत नाही. मात्र युजर्स व्हिडीओमधून किसचा आवाज येत असल्याचा दावा करत आहेत. (हे वाचा:Bigg Boss 15: आज ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत ... ) असं म्हटलं जात आहे. या दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग झाली होती. ही  प्रेमामध्ये बदलत असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र नॅशनल टेलिव्हिजनवर या दोघांनी केलेली किस सारखी वर्तवणूक युजर्सना पसंत पडलेली नाहीय. युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत. काही युजर्सनी त्यांना निर्ल्लज म्हटलं आहे. तर काहींनी फालतू म्हटलं आहे. तर काहींनी आई वडीलसुद्धा टीव्ही बघत असतील त्यांचाही विचार करा असा सल्ला दिला आहे. तर काहींनी मायशा आणि ईशानच्या या वागणुकीला चीप म्हटलं आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये मायशा आणि ईशान एकेमकांशी संवाद साधताना दिसून आले होते. यावेळी ईशान मायशाला म्हणत होता, 'माझं मन कधी नको तोडू. कारण ते आधीपासूनच खूप तुटलेलं आहे. यावर मायशा त्याला विचारते  मुली पसंत आहेत. तसेच ती ईशानला सांगते मला खूपच ऑफ बीट मुले आवडतात. नाहीतर माझे नखरे कोण सहन करणार'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या