'बिग बॉस OTT' मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असते.
नुकताच उर्फीने डीप नेक ट्रॅडिशनल ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या बोल्ड लूकमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उर्फीची फोटोंसोबतच तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे. 'माझा वाढदिवस जवळ येत आहे. मी सर्वसाधारणपणे वाढदिवसासाठी इतकी उत्सुक नसते'.
'मात्र यावेळी माझा वाढदिवस खास आहे. कारण यावर्षी मी २५ वर्षांची होतेय. माझ्यासारखंच आणखी कोणाचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये येतो. किंवा तुम्हीही माझ्यासारखेच तूळ राशीतील आहात का? असं तिने चाहत्यांना विचारलं आहे.
उर्फी जावेद बिग बॉस ottमधून काही दिवसांतच बाहेर पडली होती. मात्र तरीसुद्धा तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
उर्फी जावेद सतत आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर येत असते. मात्र ती या सर्वांकडे दुर्लक्ष करत नवनवीन फॅशन ट्रेंड घेऊन येत असते.