विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, 'या' यादीमध्ये 'विरुष्का'ची बाजी

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जगातल्या टॉप 25 इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्समध्ये (Top 25 Global Instagram Influencers) या दोघांनीही स्थान पटकावलं आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जगातल्या टॉप 25 इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्समध्ये (Top 25 Global Instagram Influencers) या दोघांनीही स्थान पटकावलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 15डिसेंबर: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जगातल्या टॉप 25 इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्समध्ये (Top 25 Global Instagram Influencers) या दोघांनीही स्थान पटकावलं आहे. विराट या यादीत 11व्या स्थानावर आहे. भारतातील टॉप इन्फ्लूएन्सर्समध्ये विराट अव्वल आहे. त्याने यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) मागे टाकलं आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या यादीमध्ये 24व्या स्थानावर आहे. या संदर्भात जगभरातील माहिती एकत्रित करून तिचं विश्लेषण करणाऱ्या 'हाइप ऑडिटर' (Hype Auditor) नावाच्या संस्थेनं ही यादी तयार केली आहे. स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टला 4.5 मिलियन एवढी युजर एंगेजमेंट असल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच त्याच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करणाऱ्या किंवा ती पोस्ट पाहणाऱ्यांची संख्या 45 लाख एवढी आहे. अनुष्काच्या प्रत्येक पोस्टवर 2.6 मिलियन एवढी युजर एंगेजमेंट आहे. (हे वाचा-'दरवाजा तोड दो' म्हटल्यानंतर एका क्षणात दरवाजा तोडणारा दया सध्या काय करतो?) हाइप ऑडिटरच्या या यादीनुसार विराट कोहली 11व्या स्थानावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17व्या स्थानावर आहेत.अनुष्का शर्मा 24व्या स्थानावर आहे. त्याव्यतिरिक्त अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) 43व्या, तर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) 49व्या स्थानावर आहे. या पाचच भारतीय व्यक्ती या यादीत टॉप 50मध्ये आहेत. फॉलोअर्सचा दर्जा आणि अकाउंटला मिळणाऱ्या एंगेजमेंटची विश्वासार्हता यांच्या आधारे हाइप ऑडिटरने (Hype Auditor)आघाडीच्या 1000 इन्स्टाग्राम अकाउंट्सचं विश्लेषण केलं. ही इन्स्टा अकाउंट्स ज्यांची आहेत, त्या व्यक्तींमध्ये समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या, त्यांना प्रेरित करणाऱ्या,  तसंच त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. (हे वाचा-ड्रग केसमध्ये अडकलेल्या अभिनेत्रीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं? तक्रार दाखल) जगातील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी 'फोर्ब्ज'ने (Forbs) मे महिन्यात प्रसिद्ध केली होती. त्या 100 खेळाडूंच्या यादीत विराट 66व्या स्थानावर असून, त्याचं मानधन 26 मिलियन डॉलर एवढं आहे. या यादीत स्थान मिळविणारा विराट हा पहिला भारतीय खेळाडू आहे. विराटला जाहिराती किंवा विविध करारांमधून 24 मिलियन डॉलर मिळतात. तसंच त्याचं मानधन आणि जिंकल्यावर मिळणारी बक्षिसाची रक्कम दोन मिलियन डॉलर एवढी होते. गेल्या वर्षी 25 मिलियन डॉलर मानधनासह तो या यादीत 100व्या स्थानावर होता. 2018मध्ये त्याचं स्थान 24 मिलियन डॉलरसह 83वं होतं. 11 डिसेंबर 2020 रोजी विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. 2017मध्ये लग्न या सेलिब्रिटी कपलने लग्न केलं. जानेवारी 2021मध्ये त्यांच्या बाळाचा जन्म होणार आहे. कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, 17 डिसेंबरला सुरू होणार असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळून तो भारतात परतणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published: