ड्रग केसमध्ये अडकलेल्या अभिनेत्रीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं? पोलिसांत तक्रार दाखल

आधी ड्रग कनेक्शनमध्ये अडकलेल्या अभिनेत्रीच्या नावावर आता नवा वाद सुरू झाला आहे. या अभिनेत्रीला जबरदस्ती इस्लाम स्वीकारायला भाग पाडल्याची तक्रार दाखल झाली आहे.

आधी ड्रग कनेक्शनमध्ये अडकलेल्या अभिनेत्रीच्या नावावर आता नवा वाद सुरू झाला आहे. या अभिनेत्रीला जबरदस्ती इस्लाम स्वीकारायला भाग पाडल्याची तक्रार दाखल झाली आहे.

 • Share this:
  बंगळुरू 15 डिसेंबर: ड्रग रॅकेटमध्ये अडकलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीबद्दल झालेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे. संजना गलरानी (Sanjjanaa Galrani) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. संजनाला जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावल्याचा आरोप एका वकिलाने केला आहे. संजना काही महिन्यांपूर्वी सॅण्डलवूड ड्रग प्रकरणात अडकली होती. याप्रकरणी तिला 3 महिने तुरूंगाची हवा खावी लागली होती. तब्येत ठीक नसल्याचं कारण देत ती तुरुंगातून बाहेर पडली. संजनाबद्दलचा आता नवा वाद समोर आला आहे. बंगळुरुमधील एका वकिलाने, संजनाला जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावला अशी तक्रार एका मौलवींविरोधात केली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये संजनाने हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तिचं नावंही बदलून माहिरा केलं असं नमूद करण्यात आलं आहे.
  पोलिसांनी यासंदर्भात दखल घेत करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे पडताळण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच अजीज नावाच्या व्यक्तीसोबत संजनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होती. अशा चर्चा होत्या की, दोघांचं लग्न झालं आहे. यासह, दारुल उलूम शाह वलीउल्ला मधील दस्तऐवजानुसार संजनाने इस्लाम धर्म स्वीकारला. असं नमूद करण्यात आलं.
  2006 मध्ये कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये संजनाने गंदा हेंदाती या सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर संजनाने बर्‍याच चित्रपटांत काम केलं. या अभिनेत्रीने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. संजना कलर्सच्या 'मुझसे शादी करोगे' या शोमध्ये दिसली होती.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: