दया म्हणजेच दयानंद शेट्टी नुकताच 51 वर्षाचा झाला आहे . दयानंदला दया बनविण्यात टीव्ही शो सीआयडीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या शोमध्ये तो वरिष्ठ निरीक्षक दयाची भूमिका साकारत होता. या व्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडच्या बर्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जॉनी गद्दार मध्ये देखील दयाच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं (Instagram @dayanandshetty_official)
टीव्ही शो सीआयडीनंतर दयानंदने गुट्टूर गू, अदालत आणि सीआयएफ सारख्या शोमध्ये काम केलं आहे, परंतु 2019 पासून तो कोणत्याही कार्यक्रमात किंवा चित्रपटात दिसला नाही. (Instagram @dayanandshetty_official)
मीडिया रिपोर्टनुसार दयानंद लवकरच एमएक्स प्लेयरच्या क्राइम थ्रिलर वेब सीरिजमध्ये दिसणार आहे ( Instagram @dayanandshetty_official)
एका मुलाखतीत दयानंद यांनी सांगितले की 1998 पासून तो या मालिकेत सतत दरवाजे तोडत आहे. त्याचं गंमतीत असं देखील म्हटलं आहे की त्याच्या दरवाजा तोडण्याच्या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हायला हवी. 1998 सालीच त्याने सीआयडीसाठी ऑडिशन दिली होती, आणि त्याचा प्रवास दीर्घकाळापर्यंत सुरू होता. (Instagram @dayanandshetty_official)
खूप कमी लोकांना माहित आहे की, दया एका खास खेळामध्ये पारंगत आहे. 1996 मध्ये दयानंद महाराष्ट्राचा डिस्कस थ्रो चॅम्पियन झाला होता. पण दुखापतीमुळे त्याने खेळ सोडण्याचा आणि अभिनयाच्या जगात येण्याचा निर्णय घेतला. (Instagram @dayanandshetty_official)